Tuesday, June 30, 2026
Homeचंद्रपूरनाव आहे छोटा मटका; पण भल्या-भल्या वाघांना देतो झटका..! - वर्चस्वाच्या लढाईत...

नाव आहे छोटा मटका; पण भल्या-भल्या वाघांना देतो झटका..! – वर्चस्वाच्या लढाईत एका वाघाचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघ व इतर वन्यप्राण्यांच्या पर्यटनासाठी प्रसिध्द स्थळ असून या ठिकाणी सर्वसामान्य पर्यटकांसह मोठ-मोठे सेलिब्रिटी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी भेट देत असतात. अश्यातच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर विभागातील खडसंगी वनपरिक्षेत्रातील रामदेगी परिसरात छोटा मटका नामक वाघ आणि नयनतारा नामक वाघिणीचे आर्कषण आहे.नयनतारा वाघीणचे निळे डोळे पर्यटकांना भुरळ घालणारे आहे.त्यामुळे तिला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते.त्यातच काही कालावधी पूर्वी या क्षेत्रातील भागात छोटा मटका नामक वाघाने एंट्री केली.एंट्री करताच इतर वाघांना त्या क्षेत्रात भटकुही देत नाही. इतर वाघ आलेच तर त्यांना झटका दिल्याशिवाय राहत नाही.छोटा मटका या वाघाने आतापर्यंत तीन वाघांना ठार केले आहे.अश्याच प्रकारे काल सोमवारी रात्रीच्या सुमारास छोटा मटका आणि ब्रम्हा या दोन वाघांमध्ये वर्चस्वाच्या लढाईत झुंज झाली.यात ब्रम्हा नामक वाघाचा मृत्यू झाला तर छोटा मटका वाघ हा गंभीर जखमी झाला.याबाबत पर्यटकांनी वन कर्मचाऱ्यांना माहिती देताच वरिष्ठांना कळविण्यात आले व आज,मंगळवारी १३ मे रोजी परिसरात शोधमोहीम सुरू असता एक वाघ मृतावस्थेत आढळून आला.वनाधिकाऱ्यांनी मृत वाघाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.परिसरात अन्य वाघ किंवा प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून ८ लाख २८ हजार ९०४ मतदारांची होणार पडताळणी; बीएलओंकडून घरोघरी सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात "मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६" प्रभावी व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी...

यंदाही मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे वारकऱ्यांसाठी ‘चरण सेवा’ उपक्रम.. – ३ हजार लिटर आयुर्वेदिक तेलाद्वारे करण्यात येणार मालिश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे 'चरण सेवा' उपक्रम...

उद्याला शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये जल्लोषात शाळा प्रवेशोत्सव.. – पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके,गणवेश व शालेय साहित्यांच्या वितरणाचे नियोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड अंतर्गत कार्यरत ८ शासकीय व १६ अनुदानित आश्रमशाळांमध्ये उद्या,मंगळवार ३० जून २०२६ रोजी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आज,सोमवार २९ जून ते १३ जुलै २०२६ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!