Sunday, August 16, 2026
Homeनागपूरधक्कादायक..! शाळेच्या नावाचा वापर करीत अज्ञाताने व्हॉट्सॲपवर विद्यार्थिनींचे मागितले अश्लील फोटो..

धक्कादायक..! शाळेच्या नावाचा वापर करीत अज्ञाताने व्हॉट्सॲपवर विद्यार्थिनींचे मागितले अश्लील फोटो..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शहरात एक धक्कादायक तितकीच अचंभित करणारी घटना उघडकीस आली आहे.एका अज्ञाताने चक्क आठवी तसेच नवव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या पालकांना शाळेच्या नावाचा वापर करीत चक्क विद्यार्थिनींचे व्हॉट्सॲपवर अर्धनग्न फोटो मागितल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.सदरचा प्रकार नागपुरातील महाल परिसरातील एका शाळेत घडला असून सुरुवातीला शाळेत आठवी व नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या पालकांना व्हॉट्सॲपवर शैक्षणिक कामासाठी त्यांच्या मुलींचे पासपोर्ट साईजचे फोटो पाठवण्याची सूचना करण्यात आली.त्यानुसार पालकांनी अनोळखी क्रमांक असूनही कोणतीही खातरजमा न करता ते फोटो पाठवले. त्यानंतर त्याच क्रमांकावरून आरोपींनी मुलींचे चक्क अर्धनग्न फोटो मागितले गेले.त्यासाठी त्याने शासकीय योजनांचे कारण दिले. सदरचे कारण वाचून पालकांच्या मनात शंका आली. त्यामुळे त्यांनी शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधून विचारणा केली असता शाळेने असा कोणताही मॅसेज पाठवला नसल्याचे त्यांना कळले.शेवटी पालकांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. उल्लेखनीय बाब म्हणजे सदर शाळेच्या १५ ते १६ विद्यार्थिनींच्या पालकांना असे मॅसेज करण्यात आले होते.मॅसेज तर करण्यात आले,पण पालकांनी खात्री न करताच अनोळखी व्यक्तीच्या नंबरला प्रतिसाद दिला होता.अज्ञात आरोपींनी शाळेच्या नावाचा वापर करून विद्यार्थिनींचे अश्लिल फोटो मिळवण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात सायबर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सुरू असून पालकांनी कोणतीही खात्री केल्याशिवाय आपल्या पाल्यांचे फोटो शेअर करू नये,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात तरुण आढळला गळफास घेतलेल्या अवस्थेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील बॉटनिकल गार्डन समोरील चुनाभट्टी जवळच्या जंगल परिसरात एक तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

केवळ इमारती,दुरुस्ती आणि भौतिक सुविधा निर्माण करणे अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे-शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर – ‘आदर्श’ व ‘पीएम श्री’...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र व राज्य शासनाकडून शाळांच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा वेळेत व उद्देशानुरूप विनियोग झाला...

आदर्श शाळांची संख्या वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर-राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एकेकाळी मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गडचिरोलीची ओळख आता वेगाने बदलत असून संपूर्ण देशाचे लक्ष या जिल्ह्याकडे वेधले जात...

तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना दणका..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बॉलिवूड सिनेसृष्टीतील तीन बड्या कलाकारांना मोठा दणका दिला आहे.नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!