Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरनाट्य दिग्दर्शक तथा उपक्रमशील शिक्षकाचा अपघात; शिक्षकाचा जागीच मृत्यू तर पत्नी जखमी..

नाट्य दिग्दर्शक तथा उपक्रमशील शिक्षकाचा अपघात; शिक्षकाचा जागीच मृत्यू तर पत्नी जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-पती-पत्नी पॅथॉलॉजीतून रक्त तपासणी करून घराकडे दुचाकीने निघाले असतांना वाटेतच सिंदेवाही शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील महाजन इंडेन गॅस एजन्सी जवळ त्यांच्या दुचाकीला मागेहून भरधाव वेगात असलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली.यात दोघेही पती-पत्नी रस्त्यावर कोसळले. रत्यावर कोसळताच डोक्याला जबर मार लागल्याने शिक्षक पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी किरकोळ जखमी झाली.नाट्य दिग्दर्शक तथा सिंदेवाही तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गुंजेवाही येथील उपक्रमशील शिक्षक डॉ.प्रेमकुमार खोब्रागडे वय ५५ वर्षे असे अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे तर पत्नी देवांगणा खोब्रागडे वय ४८ वर्षे ह्या जखमी झाल्या.सदरची घटना काल,गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.
डॉ.प्रेमकुमार खोब्रागडे आणि त्यांच्या पत्नी सिंदेवाही येथील सहारे पॅथॉलॉजी येथे रक्त तपासणीसाठी गेले होते.तपासणी पूर्ण करून एम.एच.३४ व्ही ३३२४ क्रमांकाच्या दुचाकीवरून घराकडे निघाले.दरम्यान, मागून भरधाव वेगाने आलेल्या एम.एच.४० सी.एम. ३८५७ क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली व अपघातानंतर चालक ट्रक घेऊन फरार झाला.
धडकेत दुचाकीवरील नियंत्रण सुटून दोघेही रस्त्यावर पडले.यामध्ये प्रेमकुमार खोब्रागडे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला,तर पत्नी किरकोळ जखमी झाल्या.मात्र,ठाणेदार विजय राठोड यांनी सीसीटीव्हीच्या आधारे पाठलाग करून मूल तालुक्यातील चितगावात चालकास ताब्यात घेतले.डॉ.खोब्रागडे हे पुरोगामी सामाजिक चळवळीत सक्रीय होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!