- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कुरखेडा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुरखेडा-वाकडी मार्गावर घडली.धर्मराज तुळशीराम बोदेले वय ३७ वर्षे,रा.गोठणगांव,ता.कुरखेडा,जि.गडचिरोली असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.तर दुसऱ्या दुचाकीवरील चालक कोरची येथील आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयात विपणन निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे कासकर हे गंभीर जखमी झाले आहेत.
आज सायंकाळच्या सुमारास वाकडी मार्गावरील कुरखेडा नगरपंचायतीच्या डम्पिंग यार्ड नजिक दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसताच धडकेचा आवाज जवळपास पाचशे मीटरच्या परिसरात स्फोट झाल्यासारखा झाल्याने मार्गावरून ये-जा करणारे नागरिक तसेच शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.काहींनी १०८ क्रमांकावरून रुग्णवाहिकेस,तर काहींनी कुरखेडा पोलीस प्रशासनास संपर्क साधला.लागलीच कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना उपस्थितांच्या सहकार्याने ई-रिक्षामधून कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यात धर्मराज बोदेले यांना मृत घोषित करण्यात आले,तर कासकर यांचेवर उपचार सुरू आहेत.घटनेचा पुढील तपास कुरखेडा पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे.
- Advertisement -

