Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरदोन दुचाकींची समोरासमोर धडक; मुलगा व वडील जागीच ठार तर एकाचा वाटेतच...

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; मुलगा व वडील जागीच ठार तर एकाचा वाटेतच मृत्यू.. – दुपारच्या घटनेने हळहळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल शहरापासून काही अंतरावर  असलेल्या बल्की देव वळणावर आज,बुधवार ८ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.अपघातात वडील व मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर दुसऱ्या दुचाकीवरील एकाचा रुग्णालयात नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला.यश देविदास शेंडे वय २२ वर्षे व त्याचे वडील देविदास शेंडे वय ४५ वर्षे, रा.मारोडा,ता.मूल,जि.चंद्रपूर दोघेही बापलेक जागीच ठार झाले,तर वासुदेव सहारे,रा.भादुर्णा यांचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला.धडक इतकी भीषण होती की,दोन्ही दुचाक्या चक्काचूर झाल्या.
आज बुधवारी यश व त्याचे वडील देविदास शेंडे काही कामानिमित्त मूल येथे गेले होते.तेथील कामे आटोपून दोघेही बापलेक त्यांच्या दुचाकीने गावाकडे परत निघाले होते.अश्यातच मूल शहरापासून काही अंतरावर असलेल्या बल्की देव वळणावर येताच भादुर्णा येथील वासुदेव सहारे हे मूलच्या दिशेने निघाले असतांना दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली.धडक बसताच तिघेही खाली कोसळले.यात बापलेकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.सदरची घटना नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या वासुदेव सहारे यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असतांनाच त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच मूल पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड पथकासह घटनास्थळी दाखल झाले.घटनेचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले असून घटनेचा पुढील तपास मूल पोलिसांनी सुरू केला आहे.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!