- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या
आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी क्रांतिकारक वीर भगवान बिरसा मुंडा,धर्मगुरू पहादी पारी कुपार लिंगो, खिल्या मूठवा, गाय व गायकी आदी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना,शंकरपूरचे अध्यक्ष अमृत ठाकरे,उपाध्यक्ष प्रल्हाद वाघाडे,कोषाध्यक्ष धनंजय ठाकरे,सदस्य शंकर ठाकरे,रामेश्वर राऊत,युवराज वाघाडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती,परंपरा व सामाजिक एकोपा जपण्याचे आवाहन केले.तसेच जल,जंगल आणि जमीन यांचे संरक्षण,आदिवासी समाजाचे पारंपरिक हक्क, संविधानाने दिलेले अधिकार,वनहक्क कायदा,पेसा कायदा तसेच विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण,आरोग्य,रोजगार,सामाजिक एकता आणि युवकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे मान्यवरांनी सांगितले.आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती,परंपरा व अस्मिता जपत तिचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.कार्यक्रमास महिला,युवक,ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना,शाखा शंकरपूरचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
- Advertisement -

