Thursday, September 24, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज पोलिसांनी आयपीएल सट्टयातील टोळीचा केला पर्दाफाश -१६ लाख ३१ हजार ९००...

देसाईगंज पोलिसांनी आयपीएल सट्टयातील टोळीचा केला पर्दाफाश -१६ लाख ३१ हजार ९०० रुपयाचा मुद्देमाल केला जप्त…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- सध्याच्या घडीला आयपीएल क्रिकेटची धूम मचली असून सगळीकडेच क्रिकेट शौकीन आयपीएल वर सट्टा लावतांना दिसून येतात.काही दिवसांपूर्वीच अहेरी येथे आयपीएल सट्टयात सक्रिय टोळीचा पर्दाफाश करण्याचे प्रकरण ताजे असतानाच आयपीएल क्रिकेट सट्टयातील रोख साडेतीन लाखांची रोकड जप्त करण्याची मोठी कारवाई देसाईगंज पोलिसांनी पार पाडली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अहेरी येथे आयपीएलवर सट्टा खेळविण्या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यासह दहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेनंतर जिल्हा पोलिसांनी आयपीएल सट्टेबाजांवर करडी नजर ठेवली आह.याच पार्श्वभूमीवर बुधवारी दिनांक-१ मे रोजी देसाईगंज पोलिस ठाणे हद्दीत आयपीएलवर सट्टा खेळवणाऱ्या इसमाबाबत गुप्त माहिती प्राप्त झाल्याने देसाईगंज पोलिसांनी शहरातील विर्शी टी पॉईट चौक येथे सापळा रचून नाकाबंदी केली.नाकाबंदीदरम्यान एम.एच.३३ एसी ५४४३ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता वाहनात ३ लाख ६६ हजारांची रोख रक्कम तसेच दोन मोबाइल जप्त करण्यात आले.वाहन चालक चेतन पुरुषोत्तम मस्के रा.कोरेगाव ता.देसाईगंज याची अधिक चौकशी केली असता त्याने सर्च इंजीनच्या सहाय्याने वेबसाईटचा वापर करुन युजअर आयडी व पासवर्डच्या मदतीने आयपीएल सट्टा खेळल्या जात असल्याचे सांगितले.

यावेळी रोख रक्कम, दोन मोबाइल तसेच चारचाकी वाहन असा एकूण १६ लाख ३१ हजार ९०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.यावेळी वाहन चालकाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी नवीश नरळ रा.शेगांव ता.वरोरा जि.चंद्रपूर या दोघांविरुध्द देसाईगंज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाही पोलिस निरीक्षक पोलीस स्टेशन देसाईगंज अजय जगताप,पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, विलेश ढोके, संतोष सराटे व विलास बालमवार आदींनी पार पाडली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!