Monday, August 31, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज नगर परिषदेतील विजय हा कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा आणि जनतेच्या विश्वासाचा.. - भाजपा...

देसाईगंज नगर परिषदेतील विजय हा कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा आणि जनतेच्या विश्वासाचा.. – भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज गरपरिषदेत भारतीय जनता पक्षाला मिळालेला ऐतिहासिक विजय हा केवळ एका व्यक्तीचा नसून,तो भाजप कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम,शिस्तबद्ध संघटन आणि जनतेने पक्षावर दाखवलेले प्रेम,त्यामुळे हा विजय जनतेच्या विश्वासाचा विजय आहे,अशी भावना देसाईगंज भाजपा तालुका अध्यक्ष सुनील पारधी यांनी व्यक्त केली.
नुकताच रविवार २१ डिसेंबर रोजी देसाईगंज नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. देसाईगंज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या लता मुरलीधर सुंदरकर,तर भाजपाचे तब्बल १२ नगरसेवक निवडून आले.भाजपच्या लता सुंदरकर यांना ६ हजार ६४४ मते मिळाली,तर काँग्रेसच्या वनिता नाकतोडे यांना ६ हजार ०२८ मते मिळाली.केवळ ६१६ मतांच्या फरकाने सुंदरकर या विजयी झाल्या आहेत. विजयानंतर एका कार्यक्रमात संवाद साधतांना सुनील पारधी यांनी या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना आणि जनतेला दिले.ते म्हणाले की, माजी आमदार कृष्णा गजबे यांचे जनतेशी असलेले अतूट नाते आणि त्यांनी सर्वसामान्यांसाठी केलेले काम या विजयाचे मुख्य आधार ठरले आहे.भारतीय जनता पक्षाने नेहमीच शेतकरी, शेतमजूर,युवक, महिला आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे.आम्ही केलेल्या अविरत कार्याची पावती आज जनतेने मतपेटीतून दिली आहे.हा विजय केवळ जल्लोष करण्याचा नसून,आम्हाला अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे.प्रसंगी देसाईगंज तालुक्यातील मतदारांचे असेच प्रेम आणि आशीर्वाद भविष्यातही पक्षावर राहतील,अशी आशा सुनील पारधी यांनी व्यक्त केली.नगर परिषदेतील विजयामुळे संपूर्ण तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!