Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीआज गडचिरोली येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा..

आज गडचिरोली येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-बदलत्या डिजिटल युगात ग्राहक संरक्षणासाठी डिजिटलीकरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले. ऑनलाइन व्यवहार,डिजिटल पेमेंट प्रणाली,ई-तक्रार नोंदणी तसेच तंत्रज्ञानाधारित सेवा यामुळे व्यवहारात पारदर्शकता येऊन ग्राहकांना जलद व सुलभ सेवा मिळते,असे त्यांनी नमूद केले.ग्राहकांनी खरेदी करतांना बिल घेणे,सेवा व वस्तूंच्या दर्जाबाबत जागरूक राहणे आणि तक्रारी असल्यास अधिकृत मंचावर नोंद करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना सांगितले.
अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज,बुधवार २४ डिसेंबरला गोंडवाना कला केंद्र,गडचिरोली येथे जिल्हास्तरीय जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्राहक हक्क,तक्रार निवारण व्यवस्था तसेच डिजिटल साधनांचा प्रभावी वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमात ग्राहक संरक्षण कायदा,वजन-मापे नियमांचे पालन,स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाची भूमिका यावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले.ग्राहक हक्कांविषयी जागरूकता वाढविणे ही काळाची गरज असून, शासनाच्या विविध डिजिटल उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास चंद्रशेखर भडांगे(अशासकीय सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण समिती),तहसीलदार सागर कांबळे,शिरीष कापडे(सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी),ॲड.माधुरी आटमांडे(सदस्य,जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, गडचिरोली),प्रवीण घाटे(अशासकीय सदस्य),प्रा.अरुण पा.मुन्घाटे,उदय धकाते,विजय मुसनवार(सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन गडचिरोली),आंबेकर (तालुका पुरवठा अधिकारी,गडचिरोली),देवानंद फुलझेले (वजन-मापे अधिकारी),दीपक चौधरी(स्वस्त धान्य दुकानदार संघटना),विजय शृंगारपवार,चंद्रकांत पतरंगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी,प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून ग्राहक हक्कांविषयी जनजागृती होऊन ग्राहक संरक्षण यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होईल,असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!