Saturday, October 17, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यातील नवीन शिधापत्रिकाधारक अन्न धान्यापासून वंचित.....- अनेक वर्षांपासून नवीन कार्डधारक अन्नधान्य मिळण्याच्या...

देसाईगंज तालुक्यातील नवीन शिधापत्रिकाधारक अन्न धान्यापासून वंचित…..- अनेक वर्षांपासून नवीन कार्डधारक अन्नधान्य मिळण्याच्या आशेवरच….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- तालुक्यातील नवीन शिधापत्रिकाधारक गेली दीड ते दोन वर्षांपासून रॉशन दुकानातील अन्नधान्य मिळण्याच्या लाभापासून वंचित असून अनेक शिधापत्रिकाधारक अन्नधान्य मिळण्याच्या आशेवरच असल्याने नवीन शिधापत्रिकाधारकातील कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

घरकुलाचे लाभ मिळण्याकरिता व इतर कामाकरिता अनेक सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यांनी देसाईगंज तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी वेगळ्या नवीन शिधापत्रिका काढून घेतल्या आहेत.नवीन शिधापत्रिका काढून काही शिधापत्रिकाधारकांना जवजवळ दीड ते दोन वर्ष लोटूनही रॉशन दुकानातील अन्नधान्याचा लाभ मिळत नसल्याने अजून किती दिवस अन्नधान्यासाठी वाट बघावी लागणार? असा प्रश्न अनेक नवीन शिधापत्रिकाधारकांना पडलेला आहे.काही शिधापत्रिकाधारकांना कार्डाचे आर.सी.क्रमांक मिळूनही लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे.दगदगीच्या जीवनशैलीमध्ये दररोज मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे व पोटाची खळगी भरणारे अनेक कुटुंबे आहेत.

काही शिधापत्रिकाधारक भूमिहीन असून रोजगाराच्या संधी शोधून संसाराचा गाडा हाकण्याच्या तयारीत असून रोजगार मिळेनासा झाला आहे. अशातच अन्नधान्य मिळत नसेल तर काय करावे?असा प्रश्न उपस्थित होत आहे.काही कुटुंबांना कार्डचे आर.सी.क्रमांकही मिळाले.मात्र कितीतरी वर्षांपासून रॉशन दुकानातून अन्नधान्य मिळत नसल्याने कुटुंबातील सदस्यांवर उपासमारीची पाळी येणार की काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.शासन स्तरावरून अन्न सुरक्षा योजने अंतर्गत ग्रामीण भागात ४५ हजाराच्या आत उत्पन्न असणारे लाभार्थी तर शहरी भागात १ लाख ५० हजाराच्या आत उत्पन्न असणारे लाभार्थी निवड करून प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचा लाभ दिला जातो.मात्र दीड ते दोन वर्ष लोटूनही अन्नधान्याचा लाभ मिळत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांनी काय करावे?असा विचार सर्वसामान्यांच्या मनात घर करून सोडत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!