Saturday, June 27, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्याच्या स्वस्त धान्य दुकानदारांना ई- पॉस मशिनचे वाटप..-बोटांच्या ठशा सोबतच डोळ्यांचे...

देसाईगंज तालुक्याच्या स्वस्त धान्य दुकानदारांना ई- पॉस मशिनचे वाटप..-बोटांच्या ठशा सोबतच डोळ्यांचे स्कॅनिंग करून मिळणार धान्य…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- मागील काही वर्षांपासून स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी पॉश मशिनवर हाताचा अंगठा लावुन धान्याची ऊचल करावी लागत होती.परंतु अनेक लाभार्थ्यांच्या बोठाचे ठसे मशिनवर लागत नसल्याने त्यांना धान्याची ऊचल करतांना अडचणी लक्षात घेता लाभार्थ्यांना धान्य घेणे सुलभ व्हावे; यासाठी आता नवीन ४ जी नेटवर्क असलेली आयरिस प्रणाली युक्त नविन ई- पॉस मशिनवर बोटांच्या ठशा सोबतच डोळ्यांचे स्कॅनिंग करून शिधापत्रिका धारकांना धान्य मिळणार आहे.देसाईगंज तालुक्यातील ६४ रेशन दुकानदारांना नविन ई-पॉस मशिनचे वितरण देसाईगंज तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बोळे,निरीक्षण अधिकारी मोरे,गोदाम रक्षक गुणवंत टिकले,कंपनीचे अधिकारी विनोद गडपायले,अभियंता कैलास छिपे यांच्या उपस्थितीत दिनांक-६ जून रोजी करण्यात आले.

प्रसंगी देसाईगंज तालुक्यातील शिधापत्रिका धारकांनी जवळच्या स्वस्त दुकानात जाऊन रेशनकार्डातील सर्व व्यक्तीचे आधार प्रमाणिकरण व ईकेवायसी करून घेण्याचे आवाहन निरीक्षण अधिकारी मोरे यांनी केले आहे.

मशीनचे वाटप करतेवेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे देसाईगंज तालुकाध्यक्ष दादाजी भर्रे, कार्याध्यक्ष वासुदेव दुपारे,उपाध्यक्ष सुरेश दुनेदार, सचिव अरूण कुंभलवार,प्रमोद दोनाडकर,रवी भिलकर,अमोल जोहरी,श्रीधर कुथे,कृष्णा दोनाडकर,नाकाडे पाटील,मुखरू कुथे,खुशाल बुल्ले,अरविंद कुथे,राजिक पटेल,लीलाधर भर्रे आदीसह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!