उद्रेक न्युज वृत्त :- हिमाचल प्रदेशातील मंडीमधून लोकसभा निवडणूक जिंकलेल्या अभिनेत्री कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महिला जवानाने मारहाण केल्याचे समोर आले आहे.कंगनाने गंभीर आरोप केले असून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.कंगनाला कानाखाली मारणाऱ्या महिला जवानाचे नाव कुलविंदर कौर असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान,आता या महिला अधिकाऱ्याने कंगनाला का कानशिलात मारली याचे कारण समोर आले आहे.याबाबत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.थापड मारल्याचा आरोप असलेल्या सीआयएसएफ महिला जवानाचा व्हिडीओ समोर आला आहे.व्हिडीओमध्ये महिला कर्मचारी काय म्हणतेय त्यावरून स्पष्टपणे दिसत आहे की,शेतकरी आंदोलनाबाबत कंगना राणौतच्या जुन्या विधानावरुन तिने थप्पड मारली असल्याचे दिसत आहे.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ही सीआयएसएफ महिला जवान बोलत आहे की, ‘शेतकऱ्यांच्या आंदोलनात महिला प्रत्येकी १०० रुपये घेऊन बसायच्या,असे कंगनाने सांगितले होते.माझी आई पण तिथे होती,असेही ती महिला जवान सांगत आहे. खासदार कंगना रणौतने दिलेल्या तक्रारीनुसार,कंगना चंदीगड विमानतळावर पोहोचल्यावर सुरक्षा तपासणीनंतर ती बोर्डिंगसाठी जात असताना एलसीटी कुलविंदर कौर (सीआयएसएफ युनिट चंदीगड विमानतळ) या महिला जवानाने कंगना यांना थापड मारली.

