Friday, June 19, 2026
Homeबीडदुर्दैवी घटना..! अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू...

दुर्दैवी घटना..! अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-राज्यातील बीड जिल्हा विधानसभा मतदारसंघातून एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. आपल्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.
बाळासाहेब शिंदे बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते.त्यामुळे,आज,बुधवार २० नोव्हेंबर रोजी म्हणजेच मतदानाच्यादिवशी बाळासाहेब शिंदे हे बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते. यादरम्यान,त्यांना चक्कर आली अन् ते खाली पडले.
त्यानंतर,कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र, तिथून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात नेण्यात आले.पण,डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.दरम्यान,या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनेने शिंदे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून उमेदवार शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!