- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील मेंढा वैनगंगा नदी रेती घाटातील कोट्यवधी रुपयांचे अवैध वाळू उपसा प्रकरण ताजे असतांनाच आता कोंढाळाच्या सिंद्राई रेती घाटावर डल्ला मारण्याचा प्रकार सुरू झाल्याचे आज,बुधवारी २३ एप्रिलला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणीवरून दिसून येऊ लागले आहे.अशातच घाटात दहा ते पंधरा रेती उपसा करणाऱ्या गँगकडून उपसा सुरू असतांना संबंधित यंत्रणेने मोजमाप करून दिलेल्या सिमांकन झेंड्या नसल्याने कंत्राटदाराच्या दिवाणजीला विचारणा केली असता,सिमांकन करण्यात आलेल्या झेंड्या मच्छीमारांनी उपटून नेल्या असल्याचे सांगितले.त्यातच नवलाची बाब म्हणजे, कोंढाळा येथील तलाठी ठाकरे यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता,त्यांनीही एकच उत्तर दिल्याने देसाईगंज तालुक्यात चालले तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.सदर प्रकरणी गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचेकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
माहितीनुसार,कोंढाळा येथील पश्चिमेस असलेला सिंद्राई रेतीघाट हा नवीन रेल्वेच्या कामाकरीता आरमोरी तालुक्यातील एका कंत्राटदारास रेतीघाट प्रस्तावानुसार ४ हजार ८०६ ब्रास करीता देण्यात आला आहे व त्याची लांबी १७० मीटर तर रुंदी ८० मीटर असून एकूण क्षेत्र १ हेक्टर ३६ आर मध्ये तर उपलब्ध वाळूचा थर ३ मीटर आहे.तर GSDA यांनी प्रस्तावित केलेली खोली ही १ मीटर आहे.अशातच प्रस्तावित केलेल्या खोलीनुसार वाळू उपसा न करताच उत्खनन केले जात असल्याने गावातील प्रमुख असलेले तलाठी यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र,याठिकाणी वेगळीच परिस्थिती पहावयास मिळत आहे.अगोदरच मेंढा वैनगंगा नदी रेती घाटातून कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळू उपसा करण्यात आला आहे.अशातच आणखी कोंढाळा येथे नवे प्रकरण उदयास येऊ लागल्याने परत आंदोलन करावे लागणार काय? त्यातच सिमांकन केलेल्या झेंड्या मच्छीमारांनी नेल्या तर आता त्या झेंड्या कोण आणून देणार? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
(पुढील वृत्त- अवैध वाळू उपसा कश्या प्रकारे होतो?)
- Advertisement -

