Wednesday, June 24, 2026
Homeनागपूरविम्याच्या उर्वरित रकमेसाठी ग्राहक निवारण आयोगात तक्रार... - विम्याच्या रकमेसह पीडितांना शारीरिक,मानसिक...

विम्याच्या उर्वरित रकमेसाठी ग्राहक निवारण आयोगात तक्रार… – विम्याच्या रकमेसह पीडितांना शारीरिक,मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटीही भरपाई मंजूर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-आपण अनेकदा एखादी वस्तू,जमीन खरेदी-विक्री,कपडे खरेदी,वाहन खरेदी व इतर प्रकरणांत आपली फसवणूक केली जाते.तरीही आपण गप्प राहून ‘जाऊ द्या न..!’ असे करीत असतो.कारण त्याबद्दल आम्हाला माहिती नसते व त्याचे बळी पडून फसवणूक करणाऱ्यांची व आपल्या हक्कावर गदा आणणाऱ्यांची कॉलर टाइट होत असते.ग्राहक हा राजा असतो.हे काहीजणांना माहीतच नसते.त्यामुळे शासनाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हा स्तरावर ग्राहक तक्रार निवारण मंच म्हणजेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यालये स्थापन केली आहेत.त्यानुसार ग्राहक विद्युत पुरवठा विभाग,विमा पॉलिसी कंपन्या,घरगुती गॅस सिलेंडर,कपड्यांची दुकाने, मोबाईलची दुकाने,हॉटेल,पेट्रोल पंप,खाद्य दुकाने व इतर नाना तऱ्हेचे दुकानांविरुद्ध एक रुपयांपासून ते अमर्याद फसवणूक,जास्तीची किंमत घेणे,नकली वस्तू पुरवठा वा इतर बाबिंविरुद्ध ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये तक्रार दाखल करू शकतात.त्या ठिकाणी वकील करण्याची गरज नसते,आपण स्वतः आपली बाजू मांडू शकतो.अश्याच प्रकारे नागपूरच्या एका प्रकरणात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आरोग्य विमाधारकाच्या पत्नी व मुलाला १ लाख ४५ हजार २१७ रुपये ९ टक्के व्याजासह अदा करा,असा आदेश दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे.व्याज हे २८ डिसेंबर २०२० ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे.तसेच,पीडितांना शारीरिक मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी २० हजार रुपये भरपाईही मंजूर करण्यात आली.निधी व वैदिक पिंपळापुरे,असे पत्नी व मुलाचे नाव आहे.आयोगाचे अध्यक्ष सचिन शिंपी व सदस्य बाळकृष्ण चौधरी यांनी त्यांना दिलासा दिला आहे.मनोज पिंपळापुरे,असे मृताचे नाव होते.त्यांनी दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची मेडिक्लेम पॉलिसी काढली होती.त्यात चार लाख रुपयाचे विमा संरक्षण होते.मनोज यांचे पॉलिसी कालावधीत आजारपणामुळे निधन झाले.त्यानंतर निधी यांनी कंपनीकडे ३ लाख १ हजार ३३६ रुपयांचा दावा दाखल केला असता,त्यांना केवळ १ लाख ४१ हजार ५७५ रुपये देण्यात आले. परिणामी,त्यांनी उर्वरित रकमेसाठी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती.आयोगाने विविध बाबी लक्षात घेता निर्णय दिला असून मयताचे पत्नी व मुलास एकप्रकारे आयोगाकडून दिलासा मिळाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!