Thursday, July 16, 2026
Homeवर्धादहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला.यात पिडीत मुलगी पाच महिन्याची गर्भवती राहिल्याने आर्वी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनंतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.२५ वर्षीय गौरव सुरेश बोके व ५० वर्षीय मंगम उईके अशी आरोपींची नावे असून गुन्हा दाखल होताच दोघेही फरार झाले.पोलिसांकडून दोघांचाही शोध घेतला जात असून त्यांना पकडण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनात आर्वी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सतीश डेहनकर यांच्याकडून सुरू करण्यात आला आहे. प्रकरणातील आरोपी गौरव बोके याने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला मोबाइलवर फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याच्या जुन्या घरी बोलावले.तेथे त्याने पिडीतेवर अत्याचार केला.त्यानंतरही त्याने वारंवार शोषण केले.दरम्यान,दुसरा आरोपी मंगम उईके यानेही बळजबरीने अत्याचार केला.पीडिता पाच महिन्याची गर्भवती राहिल्याने सदरचा धक्कादायक प्रकार उजेडात आला.पीडितेने आपली बदनामी होईल, या भीतीने याबाबत कुणालाही सांगितले नाही.मात्र, पीडितेच्या बहिणीने धीर दिल्याने आर्वी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.त्यानुसार,पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय; कामगारांना मिळणाऱ्या लाभ रकमेत वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाच्या चार प्रमुख कल्याणकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!