Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंज'तो' फुकट्या मंडळ अधिकारी कोण?- रेती तस्करांकडून बारमध्ये मारतो ठर्रा…-सी सी टिव्ही...

‘तो’ फुकट्या मंडळ अधिकारी कोण?- रेती तस्करांकडून बारमध्ये मारतो ठर्रा…-सी सी टिव्ही फुटेज तपासल्यास येणार प्रकरण उघडकीस….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या काही गावांमध्ये अवैध रेती उत्खनन करून माल सुताव अशी भूमिका अनेक रेती तस्करांकडून दिसून येत आहे.अशातच चोरटी रेती वाहतूक करून अनेकांचे खिसे गरम केल्या जात असल्याची खमंग चर्चा तालुक्यात पूर्वीपासूनच सुरु असतांना रेती तस्करांकडून बारमध्ये दारूचा ठर्रा मारणारा तो’ फुकट्या मंडळ अधिकारी कोण? असा प्रश्न निर्माण झाला असल्याने गडचिरोली जिल्ह्याची सीमा संपताच व चंद्रपूर जिल्ह्याची सीमा लागताच; पश्चिमेकडील वैनगंगा नदी पलीकडील बार मधील सी सी टिव्ही फुटेज तपासल्यास दारूचा ठर्रा मारणाऱ्या फुकट्या मंडळ अधिकाऱ्याचा भांडाफोड झाल्याशिवाय राहणार नसल्याने ‘पुढील घंटा धोक्याची’ असल्याचे सुर निघू लागले आहेत.

प्राप्त माहितीनुसार; ‘तो’ फुकट्या मंडळ अधिकारी स्वतःच पोचू भाऊ असून पदाचा रोप दाखविण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा दबक्या आवाजात देसाईगंज तालुक्यात  सुरू आहे.देसाईगंज तालुक्यात मोठ-मोठे तसेच भले मोठे अधिकारी होऊन गेलेत; मात्र त्यांची हकालपट्टी एका दणक्यात करण्यात तसेच झांगडगुत्ता करण्यास कुणीही मागेपुढे बघित नसल्याचे पूर्वीपासून दिसून येत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. अशातही “मी मोठा.. मी मोठा म्हणवणारा ‘तो’ फुकट्या मंडळ अधिकारी स्वतः ला ग्रेट समजून तसेच दारूचा ठर्रा मारून ‘तो मी नव्हेच’अशी भूमिका घेतांना दिसून येत आहे.मात्र ‘तेरा भी घडा भरणे वाला है भय्या’ असे सदर प्रकारावरून दिसून येत असल्याने ‘नाच तर बंगल्यावरच होणार….’ असल्याची खात्रीशिर माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!