Friday, October 16, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा येथील अव्वल कारकून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

कुरखेडा येथील अव्वल कारकून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली) :-तक्रारदारास आदिवासी ते आदिवासीला जमीन विक्री करण्याच्या परवानगीचे आदेश तयार करून दिल्याचा मोबदला म्हणून उपविभागीय अधिकारी कार्यालय कुरखेडा येथील अव्वल कारकून आरोपी नागसेन वैद्य याने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी

केली.मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.एसीबीच्या पथकाने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला.दरम्यान, आरोपी नागसेन वैद्य वय ४६ वर्षे यास तडजोडीअंती तक्रारदाराकडून १३ हजारांची लाच स्वीकारताना उपविभागीय कार्यालय कुरखेडा येथील त्याच्याच कक्षात एसीबीने रंगेहाथ पकडले.दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीस मंगळवारला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांचा पीसीआर सुनावला आहे.त्याच्याविरुद्ध कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सदर कारवाई पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनात पोनि श्रीधर भोसले, पोहवा शंकर डांगे, राजेश पद्मगिरीवार,पोअं संदीप उडान,संदीप घोरमोडे,चापोना प्रफुल डोर्लीकर यांनी केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!