Tuesday, July 28, 2026
Homeचंद्रपूर'तुला पुढच्या गावापर्यंत सोडतो'; असे सांगून नेले जंगलात..! -अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून...

‘तुला पुढच्या गावापर्यंत सोडतो’; असे सांगून नेले जंगलात..! -अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार असलेल्या वनरक्षकास तीन दिवसांनी अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन अत्याचार केल्याची घटना मंगळवार ५ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती.प्रकरणी वनरक्षकावर बल्लारपूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल होताच वनरक्षक फरार झाल्याने पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता.अश्यातच फरार झालेल्या वनरक्षकाला तीन दिवसांनी गोंदिया येथून अटक करण्यात आली आहे.रंजीत दुर्योधन वय ३० वर्षे असे नराधम आरोपीचे नाव आहे.आरोपीला तीन दिवसाचा पिसीआर देण्यात आला आहे.घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शब्बीर पठान,कुमरे, विकास जुमनाके करीत आहेत.
  •     प्रकरण काय?
अल्पवयीन मुलगी व तिचा मित्र कॉलेजची सुट्टी होताच दुचाकीने चंद्रपूरहून गावाकडे जात होते.जात असतांना वाटेतच त्यांच्या दुचाकीत बिघाड आल्याने ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत असतांनाच चंद्रपूरहून कारवा येथे जाणारा वनरक्षक रंजीत दुर्योधन त्यांच्या जवळ थांबला व मुलाला दमदाटी करत तुला खोट्या केस मध्ये अडकवतो,असे म्हणत पैसे मागितले.त्यानंतर अल्पवयीन मुलीला तुला पुढच्या गावापर्यंत सोडतो असे सांगून चंद्रपूर-जुनोना मार्गावरील जंगलात नेले आणि तिच्यावर जबरदस्ती करून अत्याचार केला व आरोपी वनरक्षकाने घटनास्थळावरून पळ काढला.पीडित मुलीने सदरची माहिती आपल्या मित्राला दिली.त्यानंतर तो तिला घरी घेऊन गेला.तिने पालकासमवेत बल्लारपूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.त्यानुसार पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता आरोपीची ओळख पटली.त्यानुसार त्याचा शोध सुरू होता.प्रकरणाचा तपास बल्लारपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक करिष्मा मोरे,पोलीस हवालदार यशवंत कुमरे सह पोलीस अंमलदार खडसे करीत होते.अश्यातच आरोपी वनरक्षक हा गोंदिया जिल्ह्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार पोलिसांनी आरोपी वनरक्षकास गोंदिया येथून अटक केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!