उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :- राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर कथित हल्ल्याचा आरोप असलेल्या बिभव कुमारला दिल्ली पोलिसांनी आज,शनिवारी अटक केली.या घटनेमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे.या मुद्द्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे.
आज केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली आणि म्हणाले की, ते (PM मोदी) एकामागून एक आम आदमी पक्षाच्या नेत्यांना अटक करत आहेत.मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो की,तुम्ही हा ‘जेल का खेल’ खेळत आहात.उद्या मी माझ्या सर्व प्रमुख नेते, आमदार,खासदारांसह दुपारी १२ वाजता भाजप मुख्यालयात येत आहे. तुम्ही ज्याला पाहिजे त्याला तुरुंगात टाकू शकता.”
अरविंद केजरीवाल म्हणाले की,”एकामागून एक आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे.आधी मला तुरुंगात टाकले,मनीष सिसोदिया यांना तुरुंगात टाकले.सत्येंद्र जैन यांना तुरुंगात टाकण्यात आले. संजय सिंह यांना तुरुंगात टाकण्यात आले.आज माझ्या पीएला तुरुंगात टाकण्यात आले.राघव चड्डा लंडनहून परतले आहेत,आता ते त्यांनाही तुरुंगात टाकणार असल्याचे सांगत आहेत.सौरभ भारद्वाज आतिशीला काही दिवसांत तुरुंगात टाकणार आहेत.”
पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा साधत केजरीवाल म्हणाले, “मला पंतप्रधानांना सांगायचे आहे की, पंतप्रधान ‘जेल का खेल’ खेळत आहेत. कधी कुणाला तुरुंगात टाकतात तर कधी कुणाला.उद्या १२ वाजता आमच्या सर्व मोठ्या नेत्यांसोबत,मी भाजप मुख्यालयात येत आहे.तुम्हाला ज्यांना तुरुंगात टाकायचे आहे,त्यांना तुरुंगात टाका.
ते म्हणाले, “आम आदमी पक्ष हा एक विचार आहे, तुम्ही तो संपवू शकत नाही.जर तुम्ही आम आदमी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकले तर संपूर्ण देशात १०० पट अधिक नेते जन्माला येतील.मी उद्या १२ वाजता येतोय,तुम्हाला ज्याला तुरुंगात टाकायचे असेल त्याला टाका.”

