Monday, July 13, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्याच्या गांधीनगर येथील तरुणाचा करंट लागून मृत्यू….

देसाईगंज तालुक्याच्या गांधीनगर येथील तरुणाचा करंट लागून मृत्यू….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- कोरची तालुक्यातील जामणारा येथील बंधाऱ्याच्या खोदकामाचे काम आटोपून कोटगुल येथील तलावाचे खोदकाम करण्याकरिता ट्रकमध्ये पोकलैंड घेऊन जात असतांना छत्तीसगढ राज्याच्या पाटणखास गावाजवळ ट्रक मध्ये ठेवलेल्या पोकलैंडला कमी उंचीच्या ११ केव्हीचे तार लागुन दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता चेतनने ओल्या बांबुने जीवंत वीजेच्या तारा वर उचलण्याचा प्रयत्न केला असता बांबु ओला असल्याने वीजेचा शॉक लागुन बेशुद्ध पडला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सोबत असलेल्या लोकांनी चेतनला तात्काळ उपचार्थ कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.दरम्यान कुरखेड्यावरून देसाईगंजकडे येत असतांना चेतनने वाटेतच दम तोडला.सदरची घटना काल,१७ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.चेतन शंकर आदे वय २५ वर्षे असे मृतकाचे नाव असून तो देसाईगंज तालुक्यातील गांधीनगर येथील रहिवासी आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!