Thursday, August 27, 2026
Homeचंद्रपूरतहसीलदारासह तलाठ्यास पगार पडले कमी; कारवाई टाळण्यासाठी केली पैश्याची मागणी..

तहसीलदारासह तलाठ्यास पगार पडले कमी; कारवाई टाळण्यासाठी केली पैश्याची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-आता यांना काय म्हणावे? तहसीलदारासह तलाठ्यास पगार कमी पडत असावे,त्यामुळे गौण खनिज उत्खनन प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी बल्लारपूरच्या तहसीलदारांसह तलाठ्याने तब्बल २ लाख २० हजार रुपयांची लाच मागितल्याची खळबळजनक घटना काल,मंगळवारी १ एप्रिलला उघडकीस आली.याप्रकरणी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बल्लारपूरचे तहसीलदार अभय गायकवाड यांना ताब्यात घेतले,तर कवडजई येथील तलाठी सचिन पुकळे हा घटनास्थळावरून पळाल्याने शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.
तक्रारदारांचा बिल्डिंग मटेरिअल सप्लायरचा व्यवसाय आहे.तसेच मौजा कवडजई गावात शेती आहे.या शेतशिवारात २३ मार्च रोजी शेतजमीन समतल करण्यासाठी मुरुम काढण्याचे काम करत होते.मुरुम उत्खननाची परवानगी नसल्याने बल्लारपूर येथील तहसीलदार अभय गायकवाड व तलाठी सचिन पुकळे यांनी कारवाई टाळण्यासाठी २ लाख २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.कारवाईच्या भीतीपोटी तक्रारदाराने १ लाख १९ हजार ९०० रुपये त्यांना दिले.उर्वरित १ लाख रुपये मागणीसाठी तहसीलदार अभय गायकवाड व तलाठी पुळके यांनी तक्रारदाराकडे तगादा लावला होता.
याबाबत तक्रार त्याने लाचलुचपत विभागाकडे केली. पथकाने पडताळणी केली असता,तहसीलदार गायकवाड यांनी दिलेल्या प्रोत्साहनानुसार व तलाठी पुळके लाचेची मागणी केल्याचे समोर आले. तहसीलदार गायकवाड यांना ताब्यात घेतले असून पुकळे फरार आहे.सदरची कारवाई नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान,संजय पुरंदरे,सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्त्वात रोशन चांदेकर,हिवराज नेवारे, अमोल सिडाम,प्रदीप ताडाम,सतीश सिडाम आदींनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!