- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-गावावरून काही कामानिमित्त तहसील कार्यालयात गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा तहसील कार्यालयाच्या गेट जवळ भोवळ येऊन खाली कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २७ मार्चला दुपारच्या सुमारास तुमसर तहसील कार्यालय परिसरात घडली.सुरेश चावके वय ४५ वर्षे,रा.हसारा, ता.तुमसर,जि.भंडारा असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.
दहावी,बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या असून पुढील शैक्षणिक सत्राकरीता दस्तऐवजांची जुळवाजुळव करून एखाद्याचे जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला,निराधार योजनेचे फॉर्म वा इतर शेती विषयक कामांकरीता शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य नागरिक तहसील कार्यालयात उन्हा-तान्हात हेलपाटे मारीत असतात,पण काम होण्याचे नावच घेत नाही.त्यातच अश्याच काही कामानिमित्त सुरेश चावके हे आज गुरुवारी दुपारच्या सुमारास तुमसर तहसील कार्यालयात गेले होते.तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच त्यांना अस्वस्थ वाटू लागले.अस्वस्थामुळे त्यांना भोवळ आली व ते खाली कोसळले.तहसील परिसरात असलेल्या नागरिकांनी दृश्य बघताच धाव घेतली.मात्र, सुरेश चावके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती तुमसर पोलीस प्रशासनास मिळताच पोलिसांनी पथकासह तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केला.घटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

