- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-एका २५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरीच स्वतःला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज,शनिवार २४ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.सदरची घटना ही ब्रम्हपुरी तालुक्याच्या खंडाळा गावात घडली.रोहित रवींद्र हरडे वय २५ वर्षे,रा.खंडाळा,ता.ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो ब्रम्हपुरी शहरातील एका राईस मिलमध्ये ऑपरेटर म्हणून काम करायचा.
नेहमीप्रमाणे आज शनिवारी सकाळच्या सुमारास रोहितला झोपेतून जागे करण्यासाठी पालकांनी त्याच्या खोलीचे दार ठोठावले.खोलीचे दार आतून बंद असल्याने बराच वेळ आवाज देऊनही त्याने कुठलाही प्रतिसाद दिला नाही.त्यामुळे पालकांना संशय आला.घरा शेजारील नागरिकांनी घटनास्थळी दाखल होत खोलीचे दार तोडून आत प्रवेश करताच रोहित गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.समोरील दृश्य पाहून आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला.लागलीच उपस्थित नागरिकांनी घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.विशेष म्हणजे,रोहितला ऑनलाईन गेम खेळण्याची लत लागली होती.त्यात तो पैसे गुंतवायचा. असे करता-करता पैसे हरत गेला आणि तो कर्जबाजारी झाला.यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
- Advertisement -

