- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकानेच शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील समाजसेवा विद्यालयात घडली.दरम्यान,विद्यार्थिनीने काल,शुक्रवारी दिलेल्या तक्रारीवरून शिक्षकाविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.रुपेश गुलाब डोर्लीकर वय ४६ रा. वाढोणा असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
आरोपी शिक्षकाने बुधवारी शाळा सुरु असताना विज्ञानाची वही तपासण्यासाठी विद्यार्थिनीला जवळ बोलावून विनयभंग केला.याबाबत विद्यार्थिनीने मुख्याध्यापकांना सांगितले असता त्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार देण्यास सांगितले.दरम्यान,पीडित मुलीने शुक्रवारी तळोधी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता पोलिसांनी आरोपी शिक्षकावर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक केली.सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अजितसिंग देवरे यांनी केली.
- Advertisement -

