- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या १७ दिवसांवर येऊन ठेपली असून येत्या २० नोव्हेंबरला मतदान व लगेच तीन दिवसांत म्हणजेच २३ नोव्हेंबरला मत मोजणी प्रक्रिया पार पडून ‘मी म्हटलो नं आमचाच होणार आमदार म्हणून’ असे सर्वत्र दिसून येणार आहे. अशातच राज्यातील पक्षांकडून उमेदवारी न मिळालेले काही नवखे व आजी-माजी यांनी मिळून बंडखोरी पुकारीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २९ ऑक्टोंबरला उमेदवारी अर्ज दाखल करीत पक्षविरोधी भूमिका बजावली असल्याचे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दिसून आले.त्यामुळे नेते मंडळींकडून बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी अख्खी दिवाळी संपून चांगलीच दमछाक झाली आहे. आता उद्या,सोमवारी ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजे पर्यंत उमेदवारी माघारी नंतर विविध मतदासंघांतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काही जणांच्या बंडखोरीमुळे निवडणुकीच्या रिंगणात अनेकांना फटका तर बसणारच आहे.तर काहींना त्याचा किंचितही फरक पडणार नाही.अशातच काही जाणकारांनी नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले की,एखाद्या व्यक्तीला जेव्हा एखाद्या पक्षाचा सिम्बॉल लागतो; तेव्हा अशा व्यक्तीची समाज,सामाजिक कार्य, पदाधिकारी,कार्यकर्ते व इतर क्षेत्रातील ओळख ही
आगळी-वेगळी व सन्मानपूर्वक असते.त्यात शंकाच नाही.जो-कुणी जोपर्यंत पक्षाशी बांधिलकी जोपासतो किंवा पक्षात असतो; तो पर्यंत नमस्कार-चमत्कार नेहमी घडत असतात.अशांच्या समोर अनेकजण नतमस्तक होतांना दिसून येतात.मात्र,एकदा का, बंडखोरी केली वा पक्षाच्या बाहेर पडला की, ‘जो करेल बंडखोरी तो बसेल घरी…!’ अशी अवस्था होत असते.हे सत्य आहे व तसे चित्र हल्ली सर्वांच्या नजरेसमोरही दिसून येत आहे.ज्याच्यामुळे तुमची ओळख आहे; अशी ओळख संपली की, ‘ना घर के ना घाट के’ असे होत असते.अशांना कुणीही विचारत नाही.विरोधक झाडावर चढविण्याचे काम करीत असतात.इतरांचे म्हणणे ऐकण्यापेक्षा पूर्व इतिहास व समोरील भविष्य जाणूनच पुढचे पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे जाणकारांनी सांगितले.उद्या ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ३ वाजेपर्यंत मुदत असून ५ नोव्हेंबर पासून प्रचार कार्यास सुरुवात होणार आहे.पक्ष विरोधी भूमिका बजावणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे नेते मंडळींकडून बोलले जात आहे.यावेळी सर्वत्र चुरशीची लढत असून अनेकांचे पारडे जड असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
- Advertisement -

