Thursday, August 27, 2026
Homeगडचिरोली'त्या' वाघिणीने धुमाकूळ घालीत एक बैल,तीन शेळ्या व एका गायीसह जवळपास दहा...

‘त्या’ वाघिणीने धुमाकूळ घालीत एक बैल,तीन शेळ्या व एका गायीसह जवळपास दहा जनावरांचा पाडला फडशा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील रांगी,खारडी,वनखेडा या परिसरात मागील काही दिवसांपासून दोन बछड्यांसह वाघिणीचा वावर सुरू आहे.या वाघिणीने आतापर्यंत रांगी येथे एक बैल, खारडी येथील तीन शेळ्या,दुसानटोला येथील एका गायीसह जवळपास दहा जनावरांचा फडशा पाडला असून वाघिणीच्या या धुमाकुळीमुळे रांगी परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.रांगी परिसरातील वाघीण दोन बछड्यांसह जंगलात वावरत असल्याचे वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात दिसून आले आहे.वाघिणीने महिनाभराच्या कालावधीत जवळपास दहा जनावरांना ठार केले आहे.यामुळे या वनक्षेत्रात एकट्याने प्रवेश करू नये; गरज भासल्यासच समूहाने जावे,मोबाइलवर गाणी वाजवत जावे,गळ्याच्या सभोवताल दुपट्टा ठेवावा,बसून राहू नये,वाघांचा वावर असलेल्या वनक्षेत्रात जाणे टाळावे; असे आवाहन रांगीचे क्षेत्र सहाय्यक संजय रामगुंडेवार यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!