Thursday, August 27, 2026
Homeदेसाईगंज'जो करेल बंडखोरी तो बसेल घरी...!' - पक्षात राहणार तो पर्यंत नमस्कार-चमत्कार...

‘जो करेल बंडखोरी तो बसेल घरी…!’ – पक्षात राहणार तो पर्यंत नमस्कार-चमत्कार अन्यथा ‘ना घर के ना घाट के’..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या १७ दिवसांवर येऊन ठेपली असून येत्या २० नोव्हेंबरला मतदान व लगेच तीन दिवसांत म्हणजेच २३ नोव्हेंबरला मत मोजणी प्रक्रिया पार पडून ‘मी म्हटलो नं आमचाच होणार  आमदार म्हणून’ असे सर्वत्र दिसून येणार आहे. अशातच राज्यातील पक्षांकडून उमेदवारी न मिळालेले काही नवखे व आजी-माजी यांनी मिळून बंडखोरी पुकारीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २९ ऑक्टोंबरला उमेदवारी अर्ज दाखल करीत पक्षविरोधी भूमिका बजावली असल्याचे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दिसून आले.त्यामुळे नेते मंडळींकडून बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी अख्खी दिवाळी संपून चांगलीच दमछाक झाली आहे. आता उद्या,सोमवारी ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजे पर्यंत उमेदवारी माघारी नंतर विविध मतदासंघांतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काही जणांच्या बंडखोरीमुळे निवडणुकीच्या रिंगणात अनेकांना फटका तर बसणारच आहे.तर काहींना त्याचा किंचितही फरक पडणार नाही.अशातच काही जाणकारांनी नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले की,एखाद्या व्यक्तीला जेव्हा एखाद्या पक्षाचा सिम्बॉल लागतो; तेव्हा अशा व्यक्तीची समाज,सामाजिक कार्य, पदाधिकारी,कार्यकर्ते व इतर क्षेत्रातील ओळख ही
आगळी-वेगळी व सन्मानपूर्वक असते.त्यात शंकाच नाही.जो-कुणी जोपर्यंत पक्षाशी बांधिलकी जोपासतो किंवा पक्षात असतो; तो पर्यंत नमस्कार-चमत्कार नेहमी घडत असतात.अशांच्या समोर अनेकजण नतमस्तक होतांना दिसून येतात.मात्र,एकदा का, बंडखोरी केली वा पक्षाच्या बाहेर पडला की, ‘जो करेल बंडखोरी तो बसेल घरी…!’ अशी अवस्था होत असते.हे सत्य आहे व तसे चित्र हल्ली सर्वांच्या नजरेसमोरही दिसून येत आहे.ज्याच्यामुळे तुमची ओळख आहे; अशी ओळख संपली की, ‘ना घर के ना घाट के’ असे होत असते.अशांना कुणीही विचारत नाही.विरोधक झाडावर चढविण्याचे काम करीत असतात.इतरांचे म्हणणे ऐकण्यापेक्षा पूर्व इतिहास व समोरील भविष्य जाणूनच पुढचे पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे जाणकारांनी सांगितले.उद्या ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ३ वाजेपर्यंत मुदत असून ५ नोव्हेंबर पासून प्रचार कार्यास सुरुवात होणार आहे.पक्ष विरोधी भूमिका बजावणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे नेते मंडळींकडून बोलले जात आहे.यावेळी सर्वत्र चुरशीची लढत असून अनेकांचे पारडे जड असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!