Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरजीर्ण इमारतीचा भाग अचानक कोसळला; महिला गंभीर जखमी..!

जीर्ण इमारतीचा भाग अचानक कोसळला; महिला गंभीर जखमी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका जीर्ण इमारतीचा भाग अचानकपणे कोसळल्याने चंद्रपूर शहरात एकच खळबळ माजली. इमारतीच्या खाली सकाळच्या सुमारास काही दूध विक्रेते दुधाची विक्री करीत होते.त्याचवेळेस घटना घडल्याने इमारतीचा मलबा अंगावर पडून दूध विक्री करणारी एक महिला गंभीर जखमी झाली.सदरची घटना चंद्रपूर शहराच्या जटपुरा गेट परिसरात आज, गुरुवार ११ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली.
चंद्रपूर शहरातील जटपूरा गेट नजिकच्या परिसरात उत्तम नामक लॉज आहे.सदरच्या लॉजचे बांधकाम कितीतरी वर्षे जुने आहे.त्यातच मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसत आहे.अश्यातच आज गुरुवारी सकाळच्या सुमारास जीर्ण अवस्थेत असलेल्या उत्तम लॉजच्या इमारतीचा एक भाग अचानकपणे कोसळला.कोसळलेल्या भागाखाली दूध विक्री करणारे इतर नागरिक थोडक्यात बचावले.मात्र,यात ४५ वर्षीय मनीषा लोखंडे ह्या गंभीर जखमी झाल्या.मनीषा लोखंडे या दररोज सकाळच्या सुमारास उत्तम लॉजच्या इमारतीच्या खाली बसून दूध विक्रीचे काम करतात. घटना घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेस शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी शहरात अश्या धोकादायक इमारती किती? याकडे महानगर पालिकेने लक्ष देणे गरजेचे असून अश्यांवर तात्काळ कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!