Tuesday, July 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसुरक्षा दलास मोठे यश; १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यासह १० नक्षली...

सुरक्षा दलास मोठे यश; १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यासह १० नक्षली ठार.. – दुसऱ्या घटनेतील आयईडी स्फोटात दोन जवान गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत सुरक्षा दलास मोठे यश मिळाले असून आज,गुरुवार ११ सप्टेंबरला छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यातील मैनपूरमधील भालाडिगी माटलच्या घनदाट जंगलात १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यासह १० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.याशिवाय,छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील मालेवाही पोलिस स्टेशन हद्दीत आज,गुरुवारी नक्षलवाद्यांनी पेरलेल्या प्रेशर आयईडी स्फोटात केंद्रीय राखीव दलाच्या १९५ बटालियनचे दोन जवान जखमी झाल्याची घटना इंद्रावती नदीवरील सतधार पुलाजवळ सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली.यात इन्स्पेक्टर दिवाण सिंग गुर्जर आणि कॉन्स्टेबल आलम मुनेश गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना एअरलिफ्ट करून रायपूरला हलविण्यात आले.
छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यातील मैनपूरमधील भालाडिगी माटलच्या घनदाट जंगलात सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांविरोधात काल बुधवार पासूनच संयुक्त मोहीम सुरू आहे.गुप्त माहितीच्या आधारे एसटीएफ,कोब्रा (केंद्रीय राखीव दलाची कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट ॲक्शन)आणि राज्य पोलिस कर्मचारी यांनी काल बुधवारी या परिसरात नक्षलविरोधी मोहीम सुरू केली होती.अश्यातच आज गुरुवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.या चकमकीत सुरक्षा दलाने दहा नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.चकमकीत नक्षलवादी कमांडर मनोज उर्फ मोडेम बालकृष्ण उर्फ भास्कर ठार झाला आहे.मोडेमचा खात्मा हे सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जाते.तो ओडिसा राज्य समितीचा प्रमुख होता.मोडेमवर १ कोटी रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते.मोडेमवर हत्या,लूट आणि पोलिसांवरील हल्ले यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते.तसेच अनेक नक्षली मोहिमांचा मोडेम मास्टरमाईंड होता.अजूनही अधूनमधून गोळीबार सुरू असल्याचे रायपूर रेंजचे आयजी अमरेश मिश्रा यांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!