Monday, June 1, 2026
Homeचंद्रपूरजंगलातून शेळ्या घरी परतल्या; पण 'तो 'परतलाच नाही..

जंगलातून शेळ्या घरी परतल्या; पण ‘तो ‘परतलाच नाही..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-वन्यजीव हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे.एक महिना लोटत नाही; तोच कुठे ना कुठे वाघाच्या हल्ल्यात नागरिकांनी जीव गमावल्याची घटना उघडकीस येत आहे.नुकतेच शुक्रवार २२ मे २०२६ रोजी जंगल परिसरात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला चढवून तब्बल चार महिलांना ठार केल्याची घटना सिंदेवाही तालुक्याच्या गुंजेवाही जंगल परिसरात घडली होती. सदरची घटना ताजी असतांनाच आता चिमूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.जंगल परिसरात शेळ्या चराईसाठी नेलेल्या शेळ्या घरी परतल्या; पण शेळीपालक घरी परतलाच नाही.यात वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना काल,रविवार ३१ मे रोजी उघडकीस आली.सदरची घटना ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या बाळापूर-तळोधी वनपरिक्षेत्राच्या नेरी उपवन क्षेत्रातील बद्री पहाडी जंगल परिसरात घडली.दिलीप जानबा नन्नावरे वय ४५ वर्षे,रा.मोटेगाव, ता.चिमूर,जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळीपालकाचे नाव आहे.
दिलीप नन्नावरे शेळ्या चराईसाठी जंगल परिसरात जायचे.नेहमीप्रमाणे रविवारी सकाळच्या सुमारास शेळ्या घेऊन जंगलात गेले होते.काही वेळाने शेळ्या घरी परतल्या; पण नन्नावरे हे घरी परतलेच नाही.बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने घरच्यांनी मोबाईलवर संपर्क साधला.वारंवार फोन लावूनही फोन उचलत नसल्याने काहीतरी घटना घडली असावी,असा संशय घरच्यांना आला.त्यामुळे कुटूंबीय तसेच गावातील काही नागरिकांनी जंगल परिसरात जाऊन शोधाशोध केली असता जंगलात फाटलेले कपडे आढळून आले.पुढे जाऊन शोध घेत असतांनाच ५०० मीटर अंतरावर त्यांचा मृतदेहच आढळून आला. सदर घटनेची माहिती मिळताच तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नमवार,वन विभागाचे पथक व चिमूर पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर रुग्णालयात पाठवला.मृताच्या पश्चात पत्नी,एक मुलगा आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.घटनेने परिसरात धाकधूक वाढली असून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुचाकीचे संतुलन बिघडल्याने खाली कोसळला; तितक्यातच बस आली अन् अनर्थ घडला.. – तरुणाचा जागीच मृत्यू; तर महिला गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने स्वगावी जाण्यासाठी निघालेल्या तरुणाचा वाटेतच रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,सोमवार १ जून रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास भंडारा...

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा केली असून त्यासाठी येत्या,१८ जून २०२६ रोजी मतदान तर २२...

देसाईगंजच्या तुळशी येथे खरीपपूर्व भात लागवड प्रशिक्षण संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने देसाईगंज तालुक्याच्या मौजा-तुळशी येथे खरीप हंगामपूर्व भात लागवड प्रशिक्षण व प्रात्यक्षिक...

दोन तरुणांची इन्स्टाग्रामवर ओळख; ओळखीचे रूपांतर प्रेमात.. – एकतर्फी प्रेमात बुडालेल्या तरुणाने प्रियकर तरुणाचा चिरला गळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या दोन तरुणांचे प्रेम बहरून आले.अश्यातच 'आपण लग्न करू' असे एकतर्फी प्रेमात बुडालेल्या तरुणाने तगादा लावला.मात्र,अगोदरच विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!