Tuesday, September 8, 2026
Homeगडचिरोलीदोन तरुणांची इन्स्टाग्रामवर ओळख; ओळखीचे रूपांतर प्रेमात.. - एकतर्फी प्रेमात बुडालेल्या...

दोन तरुणांची इन्स्टाग्रामवर ओळख; ओळखीचे रूपांतर प्रेमात.. – एकतर्फी प्रेमात बुडालेल्या तरुणाने प्रियकर तरुणाचा चिरला गळा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या दोन तरुणांचे प्रेम बहरून आले.अश्यातच ‘आपण लग्न करू’ असे एकतर्फी प्रेमात बुडालेल्या तरुणाने तगादा लावला.मात्र,अगोदरच विवाहित असलेल्या तरुणाने नकार देताच एकतर्फी प्रेमात बुडालेल्या तरुणाने प्रियकर तरुणाचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कायक घटना गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील देवदा गावाजवळ काल,रविवार ३१ मे रोजी उघडकीस आली आणि पोलीस तपासात दोघांचीही सर्व करुण कहाणी समोर आली.सूरज हलदार वय ३० वर्षे,रा.मिरगन,ता.रायघर,जि.नबरंगपूर,ओडिशा असे आरोपीचे नाव आहे,तर सतीशकुमार जगदीशप्रकाश निसाद वय ३२ वर्षे,रा. नागेपल्ली,ता.अहेरी, जि.गडचिरोली असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
इन्स्टाग्रामवर ओळख झालेले दोघेही तरुण समलैंगिक प्रेमाच्या डोहात बुडाले होते.त्यातच,आरोपी सूरज हलदार प्रेमात वेडापिसा झाला आणि दोन दिवसांपूर्वी तो ओडिशातून अहेरी तालुक्याच्या नागेपल्ली येथे वास्तव्यास असणाऱ्या सतीशकुमारला भेटण्यासाठी गावी आला होता.गावी आल्यानंतर त्याला सतीशकुमार हा विवाहित असल्याचे कळले.दोन दिवस एकत्र घालवल्यानंतर,काल रविवारी पहाटे सूरज आपल्या गावी ओडिशाला जाण्यासाठी निघाला असता सतीशकुमार त्याला सोडण्यासाठी आपल्या एमएच ३४ बीएफ २५६० क्रमांकाच्या चारचाकी कारने छत्तीसगडच्या सीमाभागातून ओडिशाच्या दिशेने घेऊन जाणार होता. दरम्यान,कारने एटापल्ली तालुक्यातील देवदा गावाजवळ पोहोचताच ‘तू विवाहित आहेस,मला सांगितला नाहीस’ आपण लग्न करू’ यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडण सुरू असतांनाच रागाच्या भरात आरोपी सूरजने सोबत आणलेला चाकू काढला आणि सतीशकुमारच्या गळ्यावर वार केले.यातच त्याचा मृत्यू झाला.दरम्यान,परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सूरज हलदार याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आणि दोघांची केमेस्ट्री उघडकीस आली. प्रकरणी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!