Sunday, September 13, 2026
Homeगोंदियाचिंधीचोरपणा..! ५०० रुपयाची लाच; आरटीओ सह दोन पंटर अडकले जाळ्यात...

चिंधीचोरपणा..! ५०० रुपयाची लाच; आरटीओ सह दोन पंटर अडकले जाळ्यात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-हल्ली सगळीकडेच लाच घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.कोणी लाच स्वतः घेतो तर कोणी इतरांची नेमणूक करून ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका बजावतांना दिसून येतात.कोणी कितीही फंडे वापरले तरीही ‘ज्याचा घळा भरला तो सरला’असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.अशातच काहीजण चिंधीचोरपणा करीत असल्याचे दिसून येते.आपल्या पदाला शोभेल असे काहीतरी करावे,याचा अर्थ असा नाही की,तुम्ही गरिबांचे खिसे कापा अन् आपलेच पोट भरा.अशांना चाप बसविण्यासाठीच तर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग(एसीबी)आहे.त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे.५०० रुपयाची लाच पंटरच्या हातांनी घेऊन ‘माल सुतावो’ अशी भूमिका बजावणाऱ्या मोटार वाहन निरीक्षकास(आरटीओ) व दोन पंटर यांस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.योगेश गोविंद खैरनार वय ४६ वर्षे रा.रचना युथिका अपार्टमेंट,अमरावती रोड, नागपूर असे आरोपी मोटार वाहन निरीक्षकाचे तर नरेंद्र मोहनलाल गडपायले वय ६३ वर्षे रा.मरारटोली, गोंदिया व आश्लेश विनायक पाचपोर वय ४५ वर्षे रा. गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेज समोर,गाडगे नगर,अमरावती अशी आरोपींची नाव आहेत.
तक्रारदार यांच्या मालवाहतुकीचा ट्रेलर भंडारा-देवरी मार्गे रायपूर कडे जात असतांना आरटीओ सीमा तपासणी नाका,शिरपुर,देवरी येथे आरोपी नरेंद्र गडपायले याने एंट्रीच्या नावावर त्यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी करून आरोपी आश्लेष पाचपोर याचे मार्फत आरोपी मोटार निरीक्ष खैरनार याचेकडे दिले.विशेष म्हणजे, पथकाकडून केलेल्या चौकशीत आरोपी नरेंद्र गडपायले व आश्लेष पाचपोर हे खासगी व्यक्ती असून आरोपी योगेश खैरनार यांनी दोघांनाही बेकायदेशीपणे शिरपूर,देवरी आरटीओ सीमा तपासणी नाका येथे नेमले असल्याचे व दोघांच्या मार्फत मुंबई-कोलकाता महामार्गाने जाणाऱ्या मालवाहू वाहन चालकांकडून एंट्रीच्या नावाखाली लाच स्वीकारत असल्याचे आढळून आले आहे.दरम्यान,पथकाने तिघांनाही ताब्यात घेत देवरी पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे व धोरणात्मक बदल जारी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वाळू आणि वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट...

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!