Sunday, May 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तचारित्र्य प्रमाणपत्रावर आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी दोन पोलीस निलंबित..

चारित्र्य प्रमाणपत्रावर आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी दोन पोलीस निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात दमछाक होत असतांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनेकदा शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्यात भरपूर कालावधी निघून जात असतो. त्यातच एखाद्याने घोडचूक केली तर त्यास शिक्षा होणे अपेक्षित असते.असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात उघडकीस आला.एका व्यक्तीला देण्यात आलेल्या चारित्र्य प्रमाणपत्रावर ‘अर्जदाराला मुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाइनवर वारंवार तक्रार करण्याची सवय आहे’ असे लिहिल्याबद्दल दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.चारित्र्य प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केले आहे आणि तक्रारदार रूपेश देशमुख यांच्या चारित्र्य प्रमाणपत्रावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे.या घटनेबद्दल,चारित्र्य प्रमाणपत्र देण्याचे काम पाहणारे हेड कॉन्स्टेबल बलराम आणि मुख्यमंत्री हेल्पलाईनचे प्रभारी कॉन्स्टेबल विप्लव यांना निलंबित करण्यात आले आहे.अथनेर पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी देशमुख यांनी म्हटले की,त्यांनी स्वतःसाठी चारित्र्य प्रमाणपत्र जारी करण्यासाठी पोलिसांकडे अर्ज केला होता.चारित्र्य प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्यामुळे त्यांनी राज्यस्तरीय तक्रार निवारण मंच,मुख्यमंत्री हेल्पलाइनकडे तक्रार केली.या तक्रारीने पोलिस कर्मचारी चिडला आणि प्रमाणपत्र देतांना त्याने त्यावर लाल शाईने लिहिले की, अर्जदाराला मुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाइनवर वारंवार तक्रार करण्याची सवय आहे.सदरच्या प्रकारामुळे दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरून कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या...

ताडोबात आढळले ४२ वाघ आणि १३ बिबटे; तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक 'मचान गणना' उपक्रमात तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद...

एसीचा स्फोट; ९ जणांचा होरपळून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राजधानीत आज,रविवार ३ मे रोजी पहाटेच्या सुमारास एका निवासी इमारतीत भीषण आगीची घटना उघडकीस आली असून भीषण आगीत तब्बल ९...

२४ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह; गडचिरोली शहरात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एका २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने गडचिरोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना गडचिरोली शहराच्या धानोरा मार्गावरील शिवाजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!