Monday, May 25, 2026
Homeभंडाराचारचाकी वाहनास ट्रकची धडक; दोघे जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी; आजची...

चारचाकी वाहनास ट्रकची धडक; दोघे जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी; आजची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-चारचाकी वाहनाने नाली बांधकामासाठी मजूर घेऊन जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची धडक होऊन चारचाकी वाहनातील दोघे जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज,गुरुवार २० फेब्रुवारीला दुपारी १२ वाजेच्या सुमारास लाखनी तालुक्याच्या पालांदूर-मानेगाव रस्त्यावरील गुरढा गावाजवळ घडली.ट्रकची धडक इतकी जोरदार होती की,कारचा समोरील भाग चेंदामेंदा झाला.सदर अपघातात गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील वाहन चालक-मालक नामे प्रदीप प्रमोद बाईन वय ४३ वर्षे व प्रमोद ऋषी पुस्तोडे वय ४२ वर्षे रा.महागाव ता.अर्जुनी-मोरगाव जि.गोंदिया या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दिलिप दुर्योधन बनकर वय २४ वर्षे,निशांत मेश्राम वय २१ वर्षे व कालिदास पंधरे वय २४ वर्षे तिघेही राहणार येगाव ता.अर्जुनी-मोरगाव जि.गोंदिया हे गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच पालांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
अधिक माहिती अशी की,घटनेतील कारचे मालक प्रदीप बाईन हे त्यांच्या स्वतःच्या चारचाकी वाहनाने वाहन क्रमांक-एमएच ३३ एसी ०६५२ ने भंडारा जिल्ह्याच्या कांद्री या गावी नाली बांधकामासाठी मजूर घेऊन जात होते.अशातच पालांदूर-मानेगाव रस्त्यावरील गुरढा गावाजवळ पालांदुरच्या दिशेने ट्रक क्रमांक-एमएच ४० बीएल ७२३२ सिमेंट पाईप घेऊन भरधाव वेगाने येत होता.त्यातच चारचाकी वाहनास ट्रकने जोरदार धडक दिली.धडक देताच चारचाकी वाहणासमोर बसलेली दोघेही जागीच गतप्राण झाले.ट्रकच्या धडकेत कारचा समोरील भाग चेंदामेंदा झाला.घटनेची माहिती होताच ये-जा करणाऱ्या नागरिकांनी एकच गर्दी केली.अपघात प्रकरणी ट्रक चालक दिलीप दुर्योधन बिसेन रा.लाखेगाव ता.तिरोडा जि.गोंदिया याच्या विरोधात पालांदूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!