- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिलांची अखेर प्रतीक्षा संपली असून
फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता उशिरा मिळण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली असतांनाच आता लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता उद्यापासून द्यायला सुरुवात होणार आहे.अशातच सध्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांवरच समाधान मानावे लागणार आहे.शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असल्याने जवळपास ९ लाखांच्या वर लाडक्या बहिणी अपात्र ठरू शकतात,त्यामुळे चालू महिन्यात लाभार्थींची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी शासनाच्या वित्त विभागाकडून तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्ग करण्यात आले असल्याने उद्या शुक्रवार २१ फेब्रुवारीपासून टप्प्या-टप्प्याने लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होणार आहेत.
- Advertisement -

