- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-चारचाकी वाहनाने नाली बांधकामासाठी मजूर घेऊन जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची धडक होऊन चारचाकी वाहनातील दोघे जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज,गुरुवार २० फेब्रुवारीला दुपारी १२ वाजेच्या सुमारास लाखनी तालुक्याच्या पालांदूर-मानेगाव रस्त्यावरील गुरढा गावाजवळ घडली.ट्रकची धडक इतकी जोरदार होती की,कारचा समोरील भाग चेंदामेंदा झाला.सदर अपघातात गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील वाहन चालक-मालक नामे प्रदीप प्रमोद बाईन वय ४३ वर्षे व प्रमोद ऋषी पुस्तोडे वय ४२ वर्षे रा.महागाव ता.अर्जुनी-मोरगाव जि.गोंदिया या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दिलिप दुर्योधन बनकर वय २४ वर्षे,निशांत मेश्राम वय २१ वर्षे व कालिदास पंधरे वय २४ वर्षे तिघेही राहणार येगाव ता.अर्जुनी-मोरगाव जि.गोंदिया हे गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच पालांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
अधिक माहिती अशी की,घटनेतील कारचे मालक प्रदीप बाईन हे त्यांच्या स्वतःच्या चारचाकी वाहनाने वाहन क्रमांक-एमएच ३३ एसी ०६५२ ने भंडारा जिल्ह्याच्या कांद्री या गावी नाली बांधकामासाठी मजूर घेऊन जात होते.अशातच पालांदूर-मानेगाव रस्त्यावरील गुरढा गावाजवळ पालांदुरच्या दिशेने ट्रक क्रमांक-एमएच ४० बीएल ७२३२ सिमेंट पाईप घेऊन भरधाव वेगाने येत होता.त्यातच चारचाकी वाहनास ट्रकने जोरदार धडक दिली.धडक देताच चारचाकी वाहणासमोर बसलेली दोघेही जागीच गतप्राण झाले.ट्रकच्या धडकेत कारचा समोरील भाग चेंदामेंदा झाला.घटनेची माहिती होताच ये-जा करणाऱ्या नागरिकांनी एकच गर्दी केली.अपघात प्रकरणी ट्रक चालक दिलीप दुर्योधन बिसेन रा.लाखेगाव ता.तिरोडा जि.गोंदिया याच्या विरोधात पालांदूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisement -

