Monday, August 10, 2026
Homeचंद्रपूरचक्क बँक कर्मचाऱ्याकडून कंत्राटी कर्मचारी महिलेचा विनयभंग..

चक्क बँक कर्मचाऱ्याकडून कंत्राटी कर्मचारी महिलेचा विनयभंग..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती शहरात एका बँक कर्मचाऱ्याचा कारनामा उघडकीस आला आहे.सदरचा कर्मचारी हा बँकेतील कार्यरत कंत्राटी कर्मचारी महिलेला वारंवार त्रास द्यायचा.बँकेत असतांना जाणून बुजून स्पर्श करण्याचा प्रयत्न,रात्री बेरात्री फोन  करायचा.प्रकरणी त्रास असहाय्य झाल्याने महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली.महिलेच्या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी ४८ वर्षीय किशोर क्षिरसागर रा.ता.भद्रावती, जि.चंद्रपूर यास काल मंगळवारी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की,भद्रावती शहरात यवतमाळ अर्बन बँक असून सदरच्या बँकेत किशोर क्षिरसागर हा कर्मचारी म्हणून काम करतो.सोबतच याच बँकेत पिडीत महिला ही कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करते.दोघेही एकाच बँकेत काम करत असल्याने बँकेतील कर्मचारी म्हणून ओळख झाली.त्यानुसार एकमेकांचे मोबाईल नंबर शेयर करण्यात आले.अश्यातच आरोपी किशोर हा पीडितेला वारंवार फोन करून त्रास द्यायचा.तसेच बँकेत जवळीकता साधण्याचा प्रयत्न करायचा.त्यामुळे वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडिताने भद्रावती पोलिसांत तक्रार दाखल केली.त्यावरून आरोपीविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!