- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-काही महिन्यांपूर्वी झालेल्या वादाचे राग मनात धरून एका ग्रामपंचायत सदस्याची पूर्वी मित्र असलेल्या तरुणाने चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची घटना आज,रविवार २३ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देव्हाडी गावात घडली.अंकुश श्रीमंत साठवणे वय ३६ वर्षे, रा.देव्हाडी,ता.तुमसर असे हत्या झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे.
माहितीनुसार,अंकुश साठवणे व आरोपी रामेश्वर उर्फ मुन्ना बिरणवारे हे दोघे चांगले मित्र होते.मात्र,मागील काही कालावधीत दोघांमध्ये वाद झाल्याने आपसांत बोलणे बंद होते.अशातच अंकुश हा नागपूरला राहण्यासाठी गेला.परंतु काल,शनिवारी, ग्रामपंचायतची बैठक असल्याने तो देव्हाडी येथे आला होता.आज रविवारी,अंकुशच्या वडिलांनी आरोपीला समझोता करण्याकरिता घरी बोलावले होते.परंतु घरी येताच आरोपी रामेश्वरने अंकुशवर चाकूने सपासप वार करायला सुरुवात केली.यात पुतणी आकांक्षी संतोष साठवणे वय १५ वर्षे ही धावून आल्याने तिच्या कमरेला चाकू लागला.त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.अंकुशला तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.मात्र, उपचारादरम्यान अंकुशचा मृत्यू झाला.मृतक हा ग्रामपंचायत सदस्य असून तो अविवाहित होता. घटनेतील आरोपी रामेश्वर उर्फ मुन्ना बिरणवारे यांस पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.घटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

