Thursday, June 25, 2026
Homeदेसाईगंजग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत चोप ग्रामपंचायत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाने पुरस्कृत..

ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत चोप ग्रामपंचायत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाने पुरस्कृत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या चोप ग्रामपंचायतीने सन २०२३-२४ मध्ये राबविलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेतील ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम’ स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला असून काल,बुधवार १ ऑक्टोंबर रोजी सदर पुरस्काराचे वितरण देसाईगंज पंचायत समितीच्या संवर्ग गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे व देसाईगंज तहसील कार्यालयाच्या तहसीलदार प्रीती डूडूलकर यांच्या हस्ते चोप ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन लाडे व ग्रामपंचायत अधिकारी मेघना राऊत यांचे सत्कार करून पुरस्काराचे ६ लाख रुपयांचा धनादेश विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आला.
चोप ग्रामपंचायतीने यापूर्वीही गावात विविध उपक्रम राबवून सन २०२०-२१ मध्ये स्मार्ट ग्राम(सुंदरग्राम)स्पर्धेत तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेच्यात बहुमान मिळवला होता.शासनाच्या विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी,स्वच्छता अभियान,वृक्ष लागवड, सामाजिक सलोखा तसेच इतर उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात मोलाची भूमिका बजावल्याने गुरुवार,२४ एप्रिल २०२५ रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा पार पडला होता.चोप ग्रामपंचायतीने आतापर्यंत गावात विविध उपक्रम राबवून गावातील पाणी प्रश्न,सि.सी.रोड,नाली बांधकाम,स्मशान भूमी रोड, पाणी अडवा पाणी जिरवा अंतर्गत बंधारे,वृक्ष लागवड, पांदण रस्ते, मजगी कामे,आरोग्य शिबीरे,स्वच्छता अभियान,खुले जिम,शाळा दुरुस्ती,वर्ग खोली बांधकाम, नवीन अंगणवाडी बांधकाम,सभामंडप बांधकाम,संरक्षक भिंत बांधकाम,सोलर लाईट,सार्वजनिक शौचालये व इतर विविध विकास कामे करून गावपातळीवरील विकासात्मक कामाचा लेखाजोखा जिल्हा पातळीवर
निदर्शनास आणून देत बहुमान मिळविल्याने जिल्हा परिषदेसह पंचायत विभागाने चोप ग्रामपंचायत प्रशासन तथा ग्रामस्थांचे कौतुक करीत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!