Wednesday, September 23, 2026
Homeदेसाईगंजग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर...

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक यांना मदत व प्रत्यक्ष कामे करण्यासाठी संबंधित ग्रामसभेमार्फत नियुक्त ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.आता या सहाय्यकांना दरमहा ८ हजार रुपये मानधन,वर्षाला किमान ६ हजार मनुष्यदिवस निर्मितीचे लक्ष्य आणि १० हजारांपेक्षा अधिक मनुष्यदिवस निर्माण करणाऱ्यांना २ टक्के प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत नवीन नियमावली शासनाने जाहीर केली आहे. यासंदर्भात मृद व जलसंधारण(रोहयो) विभागाने मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे.मात्र,काही नवीन निकष लागू करण्यात आले आहेत.नवीन निकष हे ३० जून २०२७ पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर लागू राहतील.या कालावधीत कामगिरीचे मूल्यमापन करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
  • शासन निर्णयातील नमूद बाबी👇
महाराष्ट्र रोजगार हमी(विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण)योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत लागू केलेले मानधन अदा करण्यासंदर्भात पुढील निकष/अटींची पुर्तता होणे आवश्यक राहिल:-
१.नियोजित रोहयो अंतर्गत कामासाठी एका ग्रामपंचायतीसाठी एक पूर्ण वेळ ग्रामरोजगार सहायक अनुज्ञेय राहिल.
२.ग्राम रोजगार सहायकांची मानधन तत्वावर नव्याने नियुक्ती अथवा अपेक्षित काम किंवा आवश्यक अटींची पुर्तता करित नसल्यास संबंधित ग्रामरोजगार सहायकांची मानधन तत्वावरील सेवा समाप्ती यावर पूर्णतः ग्रामसभेचे नियंत्रण राहील.ग्रामरोजगार सहायकांच्या नियुक्तीचा तपशील ग्रामसभेने ग्रामपंचायतीमार्फत आयुक्त,(विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान(ग्रामीण)योजना)नागपूर यांना कळविणे बंधनकारक राहिल.
३.ग्रामपंचायत नियोजित कामांच्या आराखड्यानुसार, एकापेक्षा जास्त ग्रामरोजगार सहायक मानधन तत्त्वावर नियुक्त करणे आवश्यक असल्यास ग्रामसभेने ग्रामपंचायतीमार्फत आयुक्त,(विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान(ग्रामीण) योजना)नागपूर यांच्याकडे सदर ग्रामपंचायतीत लगतच्या तीन वर्षातील रोहयो कामांतून निर्माण मत्ता व मनुष्यदिन निर्मितीच्या माहितीच्या योग्य समर्थनासह प्रस्ताव सादर करून मंजूरी घेणे आवश्यक राहिल.ग्रामसभेने आयुक्त,(विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) योजना)नागपूर यांच्या पूर्वमंजूरी शिवाय एकापेक्षा अधिक ग्रामरोजगार सहायक नियुक्त केल्यास त्यास मानधन अनुज्ञेय राहणार नाही.
४.दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेच्या बैठकीमध्ये ग्राम रोजगार सहायकाची मानधन तत्त्वावर निवड करण्यात येईल आणि सदर नियुक्ती त्यावर्षातील दि.१ सप्टेंबरपासून पुढील वर्षातील ३१ जुलै अखेर संपुष्टात येईल.तद्नंतर पुनःश्च ग्राम रोजगार सहायकांची नव्याने मानधन तत्त्वावरील निवड त्यावर्षातील १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेच्या बैठकीत करण्यात यावी,तसेच, ग्रामसभेद्वारे नवीन ग्राम रोजगार सहायकाची नियुक्ती होईपर्यंत,पूर्वी कार्यरत असलेले ग्राम रोजगार सहायक संबंधित रोहयो कामकाज पाहतील.ग्राम रोजगार सहायकाने मागील आर्थिक वर्षात निर्माण केलेल्या मनुष्यदिनाची संख्या,कामाची गुणवत्ता,योजनेंतर्गत केलेले काम व नोंदीचे अद्ययावतीकरण इत्यादी निकषांच्या आधारेच,मुदत्तवाढ देण्याबाबतचा निर्णय ग्रामसभेने घ्यावा.
५.प्रत्येक ग्राम रोजगार सहायकाने एका वर्षात किमान ६,००० मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करणे व त्यापैकी नियुक्तीनंतरच्या पहिल्या सहा महिन्यात किमान ५०% म्हणजेच ३,००० मनुष्यदिवस निर्मिती करणे आवश्यक राहिल.निर्धारित मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण न करणारे ग्राम रोजगार सहायक ग्रामसभेद्वारा मानधन तत्त्वावरील सेवासमाप्तीस पात्र ठरतील.
६.एका वर्षात १०,००० पेक्षा जास्त मनुष्यदिनांवर, सदर ग्राम रोजगार सहायकास शासन निर्णय, दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२४ (संदर्भ क्र.१) नुसार २% प्रोत्साहनपर (incentive) रक्कम, प्रवासभत्ता व डेटा पॅक स्वतंत्रपणे देय राहिल.
७.ग्राम रोजगार सहायकास दरमहा अनुज्ञेय असलेले मानधन आयुक्त,(विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान(ग्रामीण) योजना)नागपूर यांच्यामार्फत संबंधित ग्रामपंचायतीस वितरीत केले जाईल.
८. योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार दरवर्षी साधारणपणे दोन महिने रोहयोची कामे बंद असतात. यास Pause period असे संबोधतात.योजनेतील मार्गदर्शक तत्त्वानुसार,या दोन महिन्यांच्या pause period दरम्यान ग्राम रोजगार सहायकांनी ग्रामपंचायतीतील VBG RAM G योजनेशी संबंधित कार्यालयीन कामे,जसे की जॉब कार्ड पडताळणी, विविध नोंदवही/रजिस्टर अद्ययावत करणे,लाभार्थी व मजूर नोंदीची तपासणी,E-KYC संबंधित कामे, अभिलेख अद्ययावत करणे,योजनेची प्रचार प्रसिध्दी इ. कामे तसेच,तालुका कार्यक्रम अधिकारी व ग्रामसेवकांना मदत करणे आवश्यक राहिल. योजनेतील(Pause period)मध्ये ग्राम रोजगार सहायकास दरमहा रु.२,५०० इतके मानधन अनुज्ञेय राहिल.
९.ग्राम रोजगार सहायकाच्या कामकाजासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास(उदा. सरपंच, ग्रामसेवक व तालुका कार्यक्रम अधिकारी यांना योजनेशी संबंधित कामात मदत न करणे, ग्रामपंचायती अंतर्गत निर्धारीत रोहयोचे काम करण्यास टाळाटाळ करणे इ.)अशा ग्राम रोजगार सहायकाची मानधन तत्त्वावरील नियुक्ती तात्काळ प्रभावाने समाप्त करण्याबाबतचा प्रस्ताव ग्रामसभेने ग्रामपंचायतीमार्फत आयुक्त,(विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान(ग्रामीण) योजना)नागपूर यांना सादर करावा व संबंधितास पुर्ननियुक्ती देवू नये.
१०.ग्रामपंचायती अंतर्गत रोहयोच्या कामासाठी नोंदणीकृत असलेल्या सर्व मजुरांचे E-KYC पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित ग्राम रोजगार सहायकाची राहिल.त्यासाठी,संबंधित ग्रामपंचायतीने सदर ग्राम रोजगार सहायकास आवश्यक प्रणाली, सुविधा व तांत्रिक सहकार्य उपलब्ध करुन देणे आवश्यक राहिल.ग्राम रोजगार सहायकांच्या कामासंदर्भात उक्त परि.४ मधील निकष हे प्रायोगिक तत्त्वावर दि.३०.०६.२०२७ पर्यंत लागू राहतील.योजनेची फलनिष्पत्ती पाहून त्यात शासन स्तरावरुन आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!