- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या गांधीनगर येथील सार्वजनिक बाल गोपाल गणेश उत्सव मंडळाच्या वतीने काल,शनिवार दिनांक-१४ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी शिबिर तथा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर आरोग्य तपासणी शिबिरास गांधीनगर तसेच परिसरातील नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला.यामध्ये जवळपास ५०० च्या वर नागरिकांनी मोफत औषधोपचारचा लाभ घेऊन काहींना पुढील उपचाराकरीता रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे ‘रक्तदान हेच खरे श्रेष्ठ दान’ मानून गांधीनगरच्या सार्वजनिक बाल गोपाल गणेश उत्सव मंडळाच्या २४ सदस्यांनी रक्तदान केले.
सदर शिबिर प्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम म्हणाले की,मोफत आरोग्य शिबिरे राबवून गोर-गरीब तथा सर्वसामान्य नागरिकांची सेवा करण्याचे काम प्रत्येकांच्या नशिबी नसते.मात्र,गांधीनगर येथील सार्वजनिक बाल गोपाल गणेश उत्सव मंडळाने राबविण्यात आलेले शिबिर हे वाखाणण्याजोगे आहे.त्यांचे या ठिकाणी जेवढे कौतुक करावे,तेवढे कमीच आहे.मंडळाने स्वतः पुढाकार घेऊन आज जे कार्य केलेत तश्याच प्रकारची समाजोपयोगी कार्ये पुढेही करावीत; अशी अपेक्षा व्यक्त करीत सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
सदर शिबिराचे उद्घाटक सपना धाकडे सरपंच ग्रा.पं.गांधीनगर,नेताजी सोंदरकर उपसरपंच, काँगेस नेते रामदास मसराम,सर्व ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील,तंटामुक्त समिती अध्यक्ष त्याचप्रमाणे गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.
रक्तदान व आरोग्य शिबिराच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष विनोद चंडिकार,सचिव नवनाथ भुरके,गोपाल वाढई,रवींद्र दोनाडकर,अविनाश दोनाडकर,जयेश धांडे,अक्षय चंडिकार,रवींद्र मोहुर्ले, दिवाकर कडवे,विकास दोनाडकर,प्रफुल ढोरे,वैभव मेश्राम,अजय मोहुर्ले,रोशन घोरमोडे,राकेश घोरमोडे, राहुल नखाते,कालिदास गुरनुले,सुरेश आदे,समीर दोनाडकर,जयपाल भुरके, चंद्रपाल भुरके,हनुमान गेडाम,नंदलाल मेश्राम, अंकोश वकेकार,अमोल अनोले, राहुल गेडाम तथा गणेश मंडळाचे सर्व सदस्य गण यांनी सहकार्य केले.
आरोग्य शिबिराची धुरा प्राथमिक आरोग्य केंद्राची संपूर्ण टीम व जिल्हा शल्यचिकीत्स गडचिरोली यांनी सांभाळली.शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्याने सुरेश आदे यांनी आरोग्य चमू तथा शिबीराला उपस्थित झालेले सर्व पदाधिकारी व रक्तदान करणारे सर्व सदस्य यांचे मंडळाच्या वतिने आभार मानले.
- Advertisement -

