Sunday, September 6, 2026
Homeगोंदियाशेळ्यांसाठी झाडाच्या फांद्या आणण्यासाठी गेलेल्या इसमाला वाघाने केले ठार..

शेळ्यांसाठी झाडाच्या फांद्या आणण्यासाठी गेलेल्या इसमाला वाघाने केले ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-गोरेगाव तालुक्यातील मुरदोली ते मुंडीपार दरम्यान पालेवाडा जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याची घटना आज,शनिवार दिनांक-१४ सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. बसंतराव खेतराम ढोरे वय ४५ वर्षे रा.कलपाथरी असे मृतक युवकाचे नाव आहे.बसंतराव हा काल,शुक्रवारी  शेळ्यांसाठी झाडांच्या फांद्या आणण्यासाठी पालेवाडा जंगल परिसरात गेला होता.मात्र,रात्रीपर्यंत घरी परतला नाही.कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध केली असता त्याचा थांगपत्ता लागला नाही.दरम्यान,आज शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास काही गावकरी पालेवाडा जंगल परिसरात गेले असता त्यांना बसंतरावचा मृतदेह आढळून आला.घटनास्थळावर प्रथमदर्शनी पाहता ही घटना १३ सप्टेंबर रोजीच घडली असावी,असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती गोरेगाव वन परिक्षेत्र कार्यालयाला देण्यात आली.माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून तपास कार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!