- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून,त्यांच्याकडून गांजासह दोन मोबाईल,रोख रक्कम व बॅग असा एकूण ३ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.मंगेश संतोष उंदीरवाडे वय २३ वर्षे,रा.सोनापूर,ता.चामोर्शी, जि.गडचिरोली व सागर बाबूराव मरगडे वय १९ वर्षे, रा.निमगाव,ता.पवनी, जि.भंडारा अशी अटकेतील आरोपींची नावे असून या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राथमिक चौकशीत जप्त केलेला गांजा ओडिशा राज्यातून आणल्याचे समोर आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहर परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना दोन व्यक्ती बल्लारपूरहून बामणीमार्गे चामोर्शीच्या दिशेने गांजाची वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळविण्यात आले.त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अधिकारी व पंचांच्या उपस्थितीत बल्लारपूर-बामणी मार्गावरील होंडा शोरूम व जिओ सेंटर परिसरात सापळा रचण्यात आला.आज ५ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे २:३५ वाजता पोलिसांना मिळालेल्या वर्णनाशी मिळत्याजुळत्या दोन व्यक्ती लाल-काळ्या रंगाच्या बॅगा घेऊन बामणीकडे जातांना दिसल्या.पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली असता दोघांनीही आपली नावे सांगितली.दरम्यान,त्यांच्या बॅगांची झडती घेतली असता ब्राऊन पॅकिंग टेपने गुंडाळलेली पार्सल्स तसेच सुटा गांजा आढळून आला.पोलिसांनी एकूण ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा,दोन मोबाईल फोन, ३ हजार ८०० रुपये रोख रक्कम आणि बॅग असा सुमारे ३ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली असून प्रत्यक्ष कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे,पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले,पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाच्या मार्फत करण्यात आली.
- Advertisement -

