- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-गडचिरोली येथील अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समितीचे अधिकारी व दक्षता कोरम यांना नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.या पार्श्वभूमीवर आज,गुरुवार १३ नोव्हेंबरला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार मीना यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली.या भेटीत आमदार मसराम यांनी गडचिरोली हा आदिवासी,बहुल व नक्षल प्रभावित जिल्हा असल्याने येथील जात प्रमाणपत्र तपासणी समिती कायम ठेवणे अत्यावश्यक आहे.तसेच, समितीचे अधिकारी व दक्षता कोरम किनवट तालुक्यात स्थलांतरित करणे म्हणजे जिल्ह्यातील नागरिकांवर अन्याय केल्यासारखे होईल,यामुळे जनतेत असंतोष निर्माण होऊन शासनास रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र तपासणी समिती स्थलांतर करू नये,असे मुख्य सचिव यांच्या भेटी प्रसंगी आमदार मसराम यांनी चर्चा करून निवेदन सादर केले.मुख्य सचिव मीना यांनी आमदार मसराम यांचे निवेदन स्वीकारून विषय गांभीर्याने तपासण्याचे आश्वासन दिले.या भेटीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच,जात प्रमाणपत्र तपासणी समितीचे अधिकारी व कोरमचे इतरत्र स्थलांतरण झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन केले जाईल,अशी भूमिका घेण्यात आली आहे.
- Advertisement -

