उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील अनेक गरजू महिलांना लाडकी बहीण योजनेमुळे मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.पण,ज्या गरीब आणि गरजू महिलांच्या एकाच कुटुंबातील तीन महिलांनी योजनेचा अर्ज केला होता वा इतर बाबींमुळे लाखो महिलांचे लाभ सध्या स्थितीत थांबविण्यात आले आहेत.अश्यांची अजूनपर्यंत पडताळणी करण्यात आली नसल्याने अनेकांना आर्थिक चणचण भेडसावू लागली आहे. त्यातच,लाडकी बहीण योजनेचे दीड हजार मिळत नसल्याने काही ठिकाणी महिलांना पतीच्या रोषाला तसेच मारहाणीचा सामना करावा लागतो आहे.अशीच एक घटना अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सार्सी येथे ३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री आठच्या सुमारास घटना घडली होती.दीड हजार मिळत नाही म्हणून एका मद्यपी पतीने पत्नीस बेल्टने बेदम मारहाण केली होती. प्रकरणी लोणी पोलिसांनी २८ वर्षीय आरोपी पती विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता.त्याचे म्हणणे होते की,अख्ख्या महिलांना १५०० रुपये प्रतिमहिना मिळत असतांना तू मात्र त्या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.परिणामी,तुझे नव्हे तर माझे मोठे नुकसान होत आहे,असे म्हणून पत्नीला चांगलेच झोडपले होते.त्यामुळे शासनाने लाभ बंद केलेल्या महिलांच्या अर्जांची पडताळणी करून लाभ पूर्ववत करावे,अशी मागणी जोर धरू लागली आहे.सध्या शासनाने १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी करून घ्यावी,असे लाभार्थी महिलांना कळवले आहे.पण,ज्या महिलेचा पती आणि वडील नाही; अश्या महिलांच्या बाबतीत संभ्रम निर्माण झाले होते आणि काही महिलांना चिंता वाटू लागली होती.अश्यातच आता लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये काही बदल केले जात आहेत. त्यामुळे काहीकाळ साईटमध्ये तांत्रिक समस्या येऊ शकते.ज्या महिलेचा पती आणि वडील नाही,अशा महिलांसाठी वेबसाईटवर बदल केले जाणार आहेत.ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल,असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी यांनी म्हटले आहे.यामुळे जेणेकरून कोणतीही लाभार्थी महिला योजनेपासून वंचित राहणार नाही.तसेच पुढील परिस्थिती पाहून ई-केवायसीची तारीख वाढवायची की नाही,हा निर्णय घेतला जाणार असल्याचेही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये होणार बदल..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

