Wednesday, July 15, 2026
Homeमुंबईगडचिरोलीतील जात प्रमाणपत्र तपासणी समिती इतरत्र स्थलांतरीत करू नये.. - आमदार मसरामांचे...

गडचिरोलीतील जात प्रमाणपत्र तपासणी समिती इतरत्र स्थलांतरीत करू नये.. – आमदार मसरामांचे राज्याच्या मुख्य सचिवांना साकडे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-गडचिरोली येथील अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समितीचे अधिकारी व दक्षता कोरम यांना नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यात  स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.या पार्श्वभूमीवर आज,गुरुवार १३ नोव्हेंबरला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार मीना यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली.या भेटीत आमदार मसराम यांनी गडचिरोली हा आदिवासी,बहुल व नक्षल प्रभावित जिल्हा असल्याने येथील जात प्रमाणपत्र तपासणी समिती कायम ठेवणे अत्यावश्यक आहे.तसेच, समितीचे अधिकारी व दक्षता कोरम किनवट तालुक्यात स्थलांतरित करणे म्हणजे जिल्ह्यातील नागरिकांवर अन्याय केल्यासारखे होईल,यामुळे जनतेत असंतोष निर्माण होऊन शासनास रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र तपासणी समिती स्थलांतर करू नये,असे मुख्य सचिव यांच्या भेटी प्रसंगी आमदार मसराम यांनी चर्चा करून निवेदन सादर केले.मुख्य सचिव  मीना यांनी आमदार मसराम यांचे निवेदन स्वीकारून विषय गांभीर्याने तपासण्याचे आश्वासन दिले.या भेटीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच,जात प्रमाणपत्र तपासणी समितीचे अधिकारी व कोरमचे इतरत्र स्थलांतरण झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन केले जाईल,अशी भूमिका घेण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!