Thursday, April 30, 2026
Homeचंद्रपूरगडचिरोलीच्या युवकाचा मूल तालुक्यात मृत्यू.. - दुचाकीवरील नियंत्रण सुटले

गडचिरोलीच्या युवकाचा मूल तालुक्यात मृत्यू.. – दुचाकीवरील नियंत्रण सुटले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-गडचिरोलीच्या युवकाचा मूल तालुक्यातील चांदापूर फाट्याजवळील गोसीखुर्द नहराजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोघेही नहरात पडल्याने एक जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना काल,मंगळवारी २८ जानेवारी सकाळी घडली. हेमंत परितोष गाईन वय २२ वर्षे,रा.जयनगर जि.गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे.
चंद्रपूरवरून मूल मार्गाने चामोर्शीकडे सकाळी ६ वाजता हेमंत गाईन व मुकेश माकन बाला हे दोघे एम. एच.३३ ए.एच.३६५५ क्रमांकाच्या दुचाकीने जात होते.चांदापूर फाट्याजवळील गोसेखुर्द नहरा जवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोघेही नहरात कोसळले.नहर खोल व कोरडा असल्याने दोघांनाही जबर मार लागला.त्यात हेमंत हा जागीच ठार झाला तर मुकेश जखमी झाला.या महामार्गावरील वळण धोकादायक आहे. उपाययोजना केली नाही तर आणखी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम विभागाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!