- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-मोबाईल वरती सतत ऑनलाईन व्हिडिओ पाहणे,गेम खेळणे,चॅटिंग करणे व इतर बाबी वारंवार सर्च करण्याची केव्हा-केव्हा सवय लागून जाते.आपण जडलेल्या सवयीत इतके गुरफटून जातोय की,आपण काय करतोय याचे सुध्दा आपणाला भान राहत नाही. असाच प्रकार नागपुरातील एका अल्पवयीन मुलीच्या बाबत घडलेला असल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.एका १७ वर्षीय मुलीने स्वतःच्या हाताची नस कापून आणि गळ्यावर जखमा करून आत्महत्या केली केल्याची घटना नागपुरातील धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून हि तरुणी इंटरनेटवर मृत्यूबाबत वाचायला लागली.मृत्यूनंतर काय होते,याची उत्सूकता तिला निर्माण झाली.ती रशियन संस्कृतीबाबतही इंटनेटवरून माहिती घेत होती.ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा पोलिसांचा दावा आहे.मात्र,आत्महत्या केल्याचे गूढ अजूनही कायम आहे.तिने आत्महत्या कां केली? अद्यापही स्पष्ट झालेले नाही.रविवारी रात्रीच्या सुमारास ती ऑनलाईन गेम खेळत होती.काल,सोमवारी सकाळी पालक उठल्यावर मुलगी काहीच प्रतिसाद देत नसल्याने तिच्या खोलीत गेले असता तिथे त्यांना ती रक्त बंबाळ अवस्थेत सापडली. माहितीनुसार,आधी चाकूने हातावर क्रॉसचे चिन्ह काढले.त्यानंतर तिने हाताची नस कापली.नस कापल्यानंतर तिने चाकूने गळा चिरला.आत्महत्येपूर्वी तरुणीने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे.याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.तपासानंतर आत्महत्येचे कारण पुढे येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
- Advertisement -

