Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरगडचिरोली जिल्ह्यात मुरमुऱ्याच्या पोत्यातून अवैध दारूची तस्करी करणे भोवले…-१० लाख २४ हजार...

गडचिरोली जिल्ह्यात मुरमुऱ्याच्या पोत्यातून अवैध दारूची तस्करी करणे भोवले…-१० लाख २४ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल जप्त…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर : – महाशिवरात्री सणाच्या पार्श्वभुमीवर मुरमुऱ्याच्या पोत्यातून गडचिरोली जिल्ह्यात तस्करी करताना स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिबंधित मद्यसाठा जप्त करीत मोठी कारवाई केली आहे.ही कारवाई आज गुरूवारी ७ मार्च २०२४ ला करण्यात आली.

आज,दिनांक- ७ मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास एका बोलेरो पिकअप वाहन मध्यप्रदेशातून गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या दारूची वाहतुक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.त्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर येथे सापळा रचला.चंद्रपुर मार्गाने येणारी महिंद्रा बोलेरो पिकअप क्र.एम.एच.३४ बी.जी. ४१२६ या वाहनास ताब्यात घेवून वाहनाची तपासणी केली.त्या मध्ये गोवा ब्रॅन्ड दारूनी भरलेल्या १८० एम एल च्या ३९ पेट्या किंमत एकुण – २ लाख १४ हजार पाचशे रूपये,एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्र एम. एच. ३४ बी.जी. ४१२६ किंमत ८ लाख रूपये,दोन नग मोबाईल किंमत १० हजार रूपये असा एकूण १० लाख २४ हजार ५०० रूपयचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.बल्लारपूर पोलिस ठाण्यात आरोपी फारूख शेख मुमताज शेख (वय २१) रा. नुरानी नगर, नागपूर, तुषार संतोष नेहारे (वय २३) रा. चिचभवन यांचे विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन,अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे सपोनि.ओकरे,पोउपनि विनोद भुरले,पोहवा.संजय आतकुलवार,पोकॉ.गोपाल आतकुलवार,पोकॉ.नितीन रायपुरे,सायबर गुन्हे शाखेचे पोकॉ.राहुल पोंदे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!